Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाच्या काळात सतत मायक्रोव्हेव ओव्हन वापरत आहात का?

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (17:00 IST)
स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये गेल्या काही वर्षांत आणखी एका वस्तूचा समावेश झाला आहे. ती म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन. जेवण बनवता न येणाऱ्या किंवा जेवण बनवण्यासाठी जास्त श्रम घेण्याची तयारी नसणाऱ्या लोकांसाठी मायक्रोवेव्ह तर वरदान मानलं जातं.
 
गेल्या काही वर्षांत मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर वाढला आहे. आता सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वयंपाकघरातही मायक्रोवेव्ह दिसून येतात.
 
पण मायक्रोवेव्हचा वापर कसा करावा, याबाबत अनेक प्रश्न विचारले जातात.
 
तसंच मायक्रोवेव्हमध्ये बनलेल्या किंवा गरम केलेल्या जेवणाबाबत अनेक मतप्रवाह आहेत.
 
ओव्हनमध्ये तयार करण्यात आलेलं अन्न खाल्ल्याने गॅसची समस्या होते, पोट बिघडतं, असं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवल्यास अन्नातील सगळे पोषक घटक नष्ट होतात.
 
याशिवाय, ओव्हनमध्ये बनलेलं जेवण खाल्ल्यामुळे संप्रेरकांचं (हार्मोन्स) संतुलन बिघडण्यास सुरुवात होते, असा दावाही काहीजण करताना दिसतात. पण, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेलं अन्न खाण्यास काहीच हरकत नाही.
 
ब्रोकलीमध्ये 'फ्लेव्होनॉईड' हे उपयुक्त रंगद्रव्य आढळून येतं. आहारात फ्लेव्होनॉईड घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
 
पण, ब्रोकली मायक्रोवेव्हमध्ये शिजवल्यास त्यातील 97 टक्के फ्लेव्होनॉईड नष्ट होतं, असा दावा काहीजण करतात. त्यांच्या मते, ब्रोकली पाण्यात उकळून शिजवल्यावर जितकं फ्लेव्होनॉईड नष्ट होतं, त्यापेक्षा तिप्पट प्रमाणात मायक्रोवेव्हमध्ये शिजवल्यावर नष्ट होतं.
 
पण, 2019 मध्ये याबाबत एक संशोधन करण्यात आलं होतं. या अहवालानुसार, मर्यादित वेळेपर्यंत एखादी भाजी मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यात आली तर त्यातील पोषक तत्त्वं नष्ट होत नाहीत.
 
तर एका अभ्यासानुसार, ब्रोकलीमधलं फ्लेव्होनॉईडसुद्धा आहे त्याच प्रमाणात राहतं. किंबहुना, मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यामुळे त्यातील फ्लेव्होनॉईड वाढण्यास मदत होते, असं काही तज्ज्ञ सांगतात.
 
मात्र, या संशोधनातील दाव्यांविषयी इतर तज्ज्ञांचं विरोधी मत आहे. ब्रोकली जास्त पाण्यासोबत शिजवण्यात आली, तर त्यातील पौष्टीक गुणधर्म कमी होतात, असं ते सांगतात.
 
या सर्व बाबी लक्षात घेतल्यास काही भाज्या मायक्रोवेव्हमध्ये तर काही भाज्या पारंपरिक पद्धतीने शिजवणं फायदेशीर ठरतं, हे आपल्या लक्षात येईल.
 
तुम्ही जर मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करत असाल तर सावधान! हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
 
मायक्रोवेव्हमधील उष्णता प्लास्टिकमधील विषारी अशा पॉलीमर कणांना सुटं करते. सुटं झाल्यानंतर हे पॉलिमर कण अन्नात मिसळतात.
 
या पॉलिमरमुळे शरीरातील हार्मोन्सचं विघटन होऊ लागतं. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मायक्रोवेव्हमध्ये कधीच करून नये.
 
'फ्लॅथेट्स' हे सर्वाधिक वापरले जाणारे प्लास्टिसायझर म्हणून ओळखले जातात.
 
प्लास्टिक अधिक लवचिक बनवण्यासाठी त्यांचा उपयोग होते. पाण्याच्या बाटल्या, ट्रे किंवा प्लास्टिकची आवरणं बनवण्यासाठी फ्लॅथेट्सचा वापर केला जातो.
 
फ्लॅथेट्समुळेच आपल्या चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडू लागतं.
 
फ्लॅथेट्स शरीरात गेल्यामुळे लहान मुलांमध्ये रक्तदाब वाढू लागतो. इन्सुलिन बनवण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
 
यामुळे लहान वयातच मुलांमध्ये मधुमेह आणि रक्तदाबाची समस्या दिसू लागते. दमा किंवा प्रजननासंबंधित समस्यासुद्धा यामुळे निर्माण होऊ शकतात.
 
फ्लॅथेट्समुळे शरीरातीत थायरॉईडमधील हार्मोन्सचं संतुलनही बिघडू शकतं. गर्भवती महिलेच्या पोटातील भ्रूणामधील मेंदूच्या विकासासाठी हे हार्मोन अत्यंत आवश्यक आहेत.
 
प्लास्टिकच्या डब्यांमध्ये 'बिस्मेफॉल' रसायन मोठ्या प्रमाणात आढळून येतं. बिस्मेफॉलमुळे शरीरातील संप्रेरकांचं कार्य चक्र बिघडवण्याची प्रक्रिया वेगाने होऊ लागते.
 
आपल्या आजूबाजूच्या जवळपास प्रत्येक गोष्टीत फ्लॅथेट्स आढळून येतात. लहान मुलांची खेळणी आणि बॉडी लोशनमध्येसुद्धा ते असतात.
 
उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे फ्लॅथेट्स आणखी जास्त धोकादायक ठरू शकतात, याबाबत अनेक शास्त्रज्ञांचं एकमत आहे.
 
त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिक वापरण्याऐवजी काचेची भांडी हे त्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहेत.
 
मायक्रोवेव्हचा उपयोग मुख्यतः जेवण गरम करण्यासाठी केला जातो. यामुळे अन्नात तयार होत असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात.
 
पण कोणतंही जेवण दोनपेक्षा जास्त वेळा गरम करण्यात येऊ नये, असं तज्ज्ञ सांगतात. जेवण गरम करताना 82 अंशापेक्षा जास्त गरम करू नये.
 
मायक्रोवेव्हमध्ये जेवण एकसमान स्वरूपात गरम होत नाही. काठाजवळचं अन्न लवकर गरम होतं. पण आतील बाजूचं अन्न थंडचं राहतं. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना योग्य पद्धत वापरणं आवश्यक आहे.
 
मायक्रोवेव्हमध्ये जास्त वेळ अन्न गरम केल्यास त्यात 'अॅक्रिलेमाईड' नावाचं रसायन तयार होतं. यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते, असा इशारा काही तज्ज्ञ देतात.
 
गॅस किंवा स्टोव्हवर जेवण गरम करण्याच्या तुलनेत मायक्रोवेव्हमध्ये जेवण करताना अॅक्रिलेमाईड जास्त प्रमाणात तयार होतं, असं काही तज्ज्ञ सांगतात.
 
रेडीएशनबाबत विचार केल्यास मायक्रोवेव्ह पूर्णपणे सुरक्षित आहे. यामध्ये कमी वारंवारतेच्या (फ्रिक्वेन्सी) चुंबकीय किरणांचा वापर होतो.
 
विजेच्या बल्बमध्ये सुद्धा इतक्याच फ्रिक्वेन्सीच्या किरणांचा प्रयोग होतो. ही किरणे आरोग्यासाठी आजिबात धोकादायक नाहीत.
 
मायक्रोवेव्ह पूर्वीपासूनच एक सुरक्षित उपकरण मानलं जातं. पण याचा वापर करण्यासाठी काही सूचनाही दिल्या जातात. पण विशेषतः मायक्रोवेव्हमधील प्लास्टिकच्या वापराबाबत अनेक धोके आहेत.
 
त्यामुळे सध्यातरी, मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवणं आणि गरम करणं हे दोन्ही सुरक्षित असले तरी यासाठी काही अटी व नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments