Festival Posters

कोरोना विषाणूविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर कराल तर होईल कारवाई

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2020 (09:49 IST)
सध्या जगात सगळीकडे पसरणारा कोरोना (COVID -19) हा विषाणू देशात व राज्यात गतीने पसरत आहे. कोरोना विषाणूविषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा (उदा : फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब, टिकटॉक व अन्य प्लॅटफार्म) मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रातील COVID-19 ची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र सायबर कार्यालयाने COVID 19 विषयी खोट्या बातम्या आणि अफवा पसरविणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
 
महाराष्ट्र सायबरच्या असे निदर्शनास आले आहे की, समाजातील काही विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक समाजमाध्यमाद्वारे यासंदर्भात मुद्दाम खोट्या बातम्या व अफवा पसरवून समाजात व नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करीत आहेत.
 
महाराष्ट्र सायबरने सर्व नागरिकांना अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचे व त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून समाजात भीती व दहशतीचे वातावरण पसरण्यास आणि गंभीर समस्या निर्माण होण्यापासून प्रतिबंध होईल.
 
सर्व टिव्ही चॅनेल्स, सर्व वृत्तपत्रे यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील कोणतीही बातमी खातरजमा करुनच प्रसारीत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवा पसरविणाऱ्या लोकांच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये किंवा www.cybercrime.gov.in यावर नोंद कराव्यात.
सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 14/03/2020 रोजीची "The Maharashtra CO VID- 19 Regulations 2020" ही अधिसूचना जाहीर केलेली आहे. त्यानुसार कोणतीही व्यक्ती/संस्था कोरोना विषाणू COVID-19 बाबत खोट्या बातम्या अगर अफवा पसरवताना आढळल्यास त्यांना साथरोग प्रतिबंध कायदा, 1897" च्या कलम 03 अन्वये नमूद केल्याप्रमाणे जबाबदार धरले जाईल. असे कृत्य भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अन्वये दंडनीय अपराध असल्याचे समजले जाईल. या अधिसूचनेचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना महाराष्ट्र सायबर कडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र सायबरने या अधिसूचनेद्वारे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोरोना विषाणू (COVID -19) संदर्भातील फक्त अधिकृत माहिती व बातम्यांवरच विश्वास ठेवावा.
अशी अधिकृत माहिती खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. https://www.mohfw.gov.in/

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत

मनसेने शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे भडकले संजय राऊत; राज ठाकरेंना काँग्रेससारखे धाडस दाखवण्यास सांगितले

मनोरुग्ण तरुणाच्या हल्ल्यात दोन वृद्धांचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोपीला केली मारहाण; वर्धा मधील घटना

पालघर: साप तस्करी प्रकरणात तीन आरोपींना अटक, वाहन आणि सरपटणारे प्राणी जप्त

T20 World Cup 2026: ICC च्या बैठकीत बांगलादेशला 'भारतात खेळा किंवा बाहेर पडा' असा अल्टिमेटम देण्यात आला

पुढील लेख
Show comments