suvichar

देशात कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के

Webdunia
मंगळवार, 26 मे 2020 (21:51 IST)
देशात कोरोना रुग्ण आता झपाट्याने बरे होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. मार्च महिन्यामध्ये ७.१ टक्के रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण होते. ते आता वाढून रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण ४१.६१ टक्के इतका झाला आहे. देशातील कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहे. आतापर्यंत ६० हजार ४९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारत देशाची स्थिती चांगली असून मृत्यू दर देखील कमी आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या देखील इतर देशाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
देशात ज्यावेळी पहिला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणे ७ टक्के इतके होते.
दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी हे प्रमाण ११.२४ टक्के झाले होते.
तर तिसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण २६.५९ टक्के झाले होते.
विशेष म्हणजे चौथ्या लॉकडाऊनमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४१.६१ टक्के झाले आहे.
इतर देशात मृत्यूचे प्रमाण आतापर्यंत प्रत लाख लोकसंख्येमध्ये ४.४ आहे. तर आपल्या देशात दर लाख लोकसंख्येत ०.३ टक्के आहे.
आपल्याकडे प्रति लाख लोकसंख्येत १०.७ टक्के लोक कोरोनाबाधित आहेत.
मृत्यूदरातही देशात सुधारणा झाली असून पूर्वी मृत्यूचे प्रमाण ३.०३ टक्के होते. जे आता वाढून २.८७ झाले आहे.
देशात एकूण ६१२ लॅब आहेत जिथे कोरोनाची तपासणी केली जाते.
यामध्ये ४३० लॅब या सरकारी आहेत. तर १८२ खासगी लॅब आहेत.
देशात सध्या दिवसाला सरासरी १.१ लाख कोरोनाच्या चाचण्या होत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक; १.४ लाख डॉक्टर मतदान करणार

बागेश्वर बाबांचे नागपुरात वादग्रस्त विधान

BMC Budget 2026-27 प्रदीर्घ चर्चांना आळा घालण्यासाठी नगरसेवकांकरिता 10 मिनिटांचा फॉर्म्युला लागू

पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द: आरबीआयने बंद करण्याचे आदेश जारी केले, ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग बालविवाह रोखण्यासाठी विवाह पत्रिकांवर वधू आणि वर यांची जन्मतारीख छापण्याची शिफारस महाराष्ट्र सरकारला करणार

पुढील लेख
Show comments