rashifal-2026

कोविड-१९ संदर्भात राज्यात आतापर्यंत ७२ हजार गुन्हे दाखल

Webdunia
सोमवार, 27 एप्रिल 2020 (09:25 IST)
१०० नंबर वर ७८ हजार तक्रारी
२ कोटी ७४ लाख दंडाची आकारणी
राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ७२,६९८ गुन्हे दाखल झाले असून १५,४३४ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ७४ लाख ४३ हजार ३९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती गृह विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
 
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ७८,४७४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का असून ज्यांनी नियमांचा भंग केला अशा ६१० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
 
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०९२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ४७,७८२ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
 
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १५० घटनांची नोंद झाली असून यात ४८२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी-कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने २० पोलीस अधिकारी व ८७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments