Marathi Biodata Maker

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

Webdunia
बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:06 IST)
राज्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून मंगळवारी १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: काय स्वस्त आणि काय महाग? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या, संपूर्ण यादी पहा

१० लाख घरे आणि ६,००० किमी एक्सप्रेसवेच्या प्रमुख घोषणांसह वाधवान 'चौथी मुंबई' बनणार

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित केला आणि माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने नागरी पुरस्कार आणि स्मारकाची घोषणा केली

अर्जुन आणि सानिया विवाहबंधनात अडकले

पुढील लेख
Show comments