Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेल्या 24 तासात विक्रमी 63 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, 349 जणांचा मृत्यू

Record over 63
Webdunia
सोमवार, 12 एप्रिल 2021 (09:52 IST)
राज्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. राज्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून 55 ते 60 हजारांच्या दरम्यान कोरोना रुग्ण आढळून येत होते. मात्र, आजची आकडेवारी सर्वांना धडकी भरवणारी आहे. राज्यात गेल्या 24 तासात राज्यात 63 हजार 294 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 349 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. आजची रुग्णसंख्या आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.
 
आज राज्यात 34 हजार 008 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 27 लाख 82 हजार 161 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.65 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 349 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 57 हजार 987 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.7 टक्के आहे.
 
सध्या राज्यामध्ये 5 लाख 65 हजार 587 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 9 हजार 590 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 21 लाख 14 हजार 372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34 लाख 07 हजार 245 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 15.41 टक्के आहे. सध्या राज्यात 31 लाख 75 हजार 585 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 25 हजार 694 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यातील प्रमुख शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 1,09,590, मुंबई 91100, ठाणे 74335, नाशिक 35147, औरंगाबाद 17069, नांदेड 11098, नागपूर 58507, जळगाव 10589, अहमदनगर 19937, बुलढाणा 9490, लातूर 9375 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

"मराठी भाषा" वर घोषवाक्य

१ रुपया पीक विमा योजना बंद, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली घोषणा, ९६ हून अधिक सेवा केंद्रांवर फसवणूक उघडकीस

वन नेशन, वन इलेक्शनला विरोधक मंजूर करतील! जातीय जनगणनेवरून अजित पवारांनी विरोधकांवर टीका केली, निर्णयाचे स्वागत केले

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात लपलेल्या बिबट्याचा शोध वन विभागाने केला तीव्र

LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर

पुढील लेख