Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ वर

The number of corona deaths
Webdunia
बुधवार, 16 जून 2021 (08:00 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रोजच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये रोज आढळणाऱ्या नव्या करोनाबाधितांची संख्या ५०-६० हजारांवरून १० हजारांपर्यंत खाली आली आहे. मात्र, दररोज ही आकडेवारी सातत्याने कमी होताना न दिसता मध्येच वाढतानाही दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात झालेल्या करोना मृत्यूंची संख्या थेट ३८८ च्या घरात गेली आहे. सोमवारी हाच आकडा २०० इतका नोंदवण्यात आला होता. तिथे दुसरीकडे नव्या करोनाबाधितांचा आकडा देखील कालच्या ८ हजार १२९ वरून जवळपास १२०० नी वाढून ९ हजार ३५० पर्यंत गेला आहे.
 
मंगळवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्याचा मृत्यूदर १.९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३८८ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली असून एकूण करोना मृतांचा आकडा आता १ लाख १४ हजार १५४ इतका झाला आहे. त्याचवेळी राज्यात ९ हजार ३५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५९ लाख २४ हजार ७७३ इतका झाला आहे. त्यापैकी सध्या राज्यात १ लाख ३८ हजार ३६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
आज राज्यात करोनावर मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा १५ हजार १७६ इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत करोनावर मात केलेल्या राज्यातल्या रुग्णांची संख्या ५६ लाख ६९ हजार १७९ इतकी नोंदवण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

काका आहेत का, बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल

बनासकांठा येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग, 17 कामगारांचा होरपळून मृत्यू

ठाणे : रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५६ लाख रुपयांना फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

LIVE: मनसे कार्यकर्त्यांकडून सुरक्षारक्षकास मारहाण

CM Yogi पंतप्रधान होतील? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल प्रथमच एक मोठे विधान केले

पुढील लेख
Show comments