Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Aus vs Afg : ग्लेन मॅक्सवेलचं झुंजार शतक, 292 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज माघारी

Webdunia
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (22:16 IST)
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाच्या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी धावांचं 292 आव्हान ठेवलं आहे.
त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं शतक साजरं केलंय. त्यानं या विश्वचषकात दुसऱ्यांदा शंभरी ओलांडलीय.
 
ऑस्ट्रेलियानं सातवी विकेट 91 धावांवर गमावली, पण मॅक्ससवेलनं एका बाजूनं संघर्ष सुरू ठेवला आणि संघाचा डाव सावरला. मॅक्सवेलला तो 27 आणि 33 रन्सवर असताना जीवदानही मिळालं होतं, ज्याचा त्यानं फायदा उठवला.
 
मॅक्सवेलनं पॅट कमिन्ससह आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोघांनी वन डे क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही मोडला.
 
याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जस्टिन केम्प आणि अँड्र्यू हॉलच्या नावावर होता. दोघांनी 2006 साली भारताविरुद्ध केप टाऊन वन डेत नाबाद 138 रन्सची भागीदारी रचली होती.
 
या सामन्यात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकनं आधी ट्रॅव्हिस हेडला शून्यावर बाद केलं. मग धोकादायक ठरु पाहात असलेल्या मिच मार्शला 24 धावांवर बाद केलं.
 
अझमत ओमारझाईनं ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. त्यानं एका अप्रतिम बॉलवर डेव्हिड वॉर्नरला बोल्ड केलं. वॉर्नर 18 धावांवर बाद झाला.
 
ओमरझाईनं पुढच्याच बॉलवर जॉस इंग्लिसला बाद केलं. या सामन्यात शतक झळकावणाऱ्या इब्राहिम झादराननं कोणतीही चूक न करता त्याचा झेल घेतला.
 
मग रहमत शाहच्या थेट थ्रो वर लबुशेन 14 धावांवर रन आऊट झाला.
 
मार्कस स्टॉईनिसला रशीद खाननं झटपट बाद करत ऑस्ट्रेलियाला आणखी अडचणीत आणलं. स्टॉईनसनं 6 धावा केल्या. रशीद खाननं मिचेल स्टार्कलाही मैदानात स्थिरावू दिलं नाही. तो 3 धावांवर बाद झाला.
त्याआधी इब्राहिम झादरानचं ऐतिहासिक शतक आणि रशीद खानच्या झंझावती फलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 291 धावा केल्या.
 
वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील अफगाणिस्तानची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
सेमी फायनलच्या शर्यतीमधील आव्हान मजबूत करण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. त्यांच्या फलंदाजांनी सुरूवातीपासूनच निर्धारानं खेळ केला.
झादरानची ऐतिहासिक खेळी
इब्राहिम झादराननं नाबाद 129 धावा केल्या. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा तो अफगाणिस्तानचा पहिला क्रिकेटर ठरला.
 
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झादराननं विश्वचषकातील त्याचा सर्वोत्तम खेळ या सामन्यात केला. सलामीला आलेला झादराननं संपूर्ण 50 ओव्हर फलंदाजी केली.
 
झादराननं रहमानउल्ला गुरबाझसोबत पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागिदारी केली. गुरबाझ बाद झाल्यानंतर रहमत शाहसोबत दुसऱ्या विकेटसाठी 83 धावा जोडल्या.
 
या स्पर्धेत फॉर्मात असलेला अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतउल्ला शाहिदी 26 धावांवर बाद झाला. अझमत ओमरझाईलाही 20 धावाच करता आल्या.
 
झादराननं या अवघड परिस्थितीमध्ये एक बाजू लावून धरत त्याचं शतक 131 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं पूर्ण केलं.
 
झादरान आणि रशीद खान या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 28 बॉलमध्ये नाबाद 58 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर अफगाणिस्ताननं त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
रशीद खाननं केवळ 18 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 35 धावांची खेळी केली.
 
ऑस्ट्रेलियाकडून जॉश हेझलवूडनं 2 तर मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अ‍ॅडं झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
 
‘वानखेडे’ अफगाणिस्तानच्या पाठीशी
टीम इंडिया असो वा मुंबई इंडियन्स. वानखेडे स्टेडियमवरचे चाहते कायम निळ्या जर्सीतल्या खेळाडूंच्या मागे उभे राहताना दिसतात.
 
आज अफगाणिस्तानला तो मान मिळाला. अफगाण खेळाडूंच्या प्रत्येक चौकार, षटकारावर आणि प्रत्येक चांगल्या खेळीवर चाहते भरभरून दाद देताना दिसले.
 
इब्राहिम झारदाननं शतक ठोकलं तेव्हा अख्ख स्टेडियम उभं राहिलं.
 
एरवी ज्या स्टँड्‌समध्ये ‘सचिन, सचिन’ असा जल्लोष व्हायचा किंवा जिथे रोहित-विराटचा जयघोष होतो, तिथे आज ‘रशीद रशीद’ अशा आरोळ्‌या गरजल्या.
 
रशीद खान आयपीएलमुळे इथल्या चाहत्यांच्या ओळखीचा आहे, पण तो किती लोकप्रिय आहे, तेच दिसून आलं.
 
जे प्रेम एरवी भारतीय खेळाडूंसाठी राखीव असतं, ते इथे अफगाण खेळाडूंवरही उधळलं गेलं. सामन्यातला निकाल काहीही लागला तरी अफगाणिस्ताननं मनं आधीच जिंकली आहेत.
 
अफगाणिस्तानची धडाकेबाज कामगिरी
अफगाणिस्ताननं यापूर्वीच्या दोन विश्वचषक स्पर्धेत मिळून फक्त 1 सामना जिंकला होता. या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी सर्वांनाच प्रभावित केलंय.
 
इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांना त्यांनी पराभूत करत आत्तापर्यंत 8 पॉईंट्सची कमाई केलीय.
 






Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

Syed Mushtaq Ali Trophy: T20 मध्ये गुजरातच्या उर्विलने मोडला पंतचा विक्रम,सर्वात जलद शतक झळकावले

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

IND vs AUS: प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतणार,ऑस्ट्रेलिया दौरा मध्यंतरी सोडणार

IPL Auction: IPL 2025 चा मेगा लिलाव संपला, पंत राहिला सर्वात महागडा खेळाडू, वैभव बनला करोडपती

पुढील लेख
Show comments