समास पहिला : आशंकानाम ॥ श्रीराम ॥ निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये । निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥ निराकार म्हणिजे आकार नाहीं । निराधार म्हणिजे आधार नाहीं । निर्विकल्प म्हणिजे कल्पना नाहीं । परब्रह्मासी ॥ २ ॥ निरामय म्हणिजे काये । निराभास म्हणिजे काये ।...