Marathi Biodata Maker

Dhanteras 2022 Muhurat धनत्रयोदशी 2022 पूजा मुहूर्त

Webdunia
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (08:10 IST)
यावर्षी धनत्रयोदशीबाबत संभ्रम आहे. यावेळी अमावास्येला सूर्यग्रहण असल्याने दिवाळीचा सण 25 ऐवजी 24 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. यावरून धनत्रयोदशीची तारीखही बदलली आहे.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, भांडी, कपडे खरेदी केले जातात. यासोबतच या दिवशी यमदेव, चित्रगुप्त आणि भगवान धन्वंतरी देव यांचीही पूजा केली जाते. या दिवशी घरात 13 दिवे लावणे शुभ असते.
 
धनत्रयोदशीचा सण 22 ऑक्टोबरला साजरा करणे शुभ आहे की 23 ऑक्टोबरला हे जाणून घेऊया.
 
धनतेरस हा सण तेरस म्हणजेच त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी 22 शनिवारी द्वादशी तिथी सायंकाळी 6.02 पर्यंत राहील, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल. त्रयोदशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 06.03 पर्यंत राहील.
 
अशा स्थितीत काही लोक 22 तारखेला धनत्रयोदशी साजरी करतील तर काही लोक रविवारी 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करतील.
 
अनेक जाणकारांच्या मते धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला आहे आणि नरक चतुर्दशीही याच दिवशी राहील.
 
परंतु आमचा सल्ला असा आहे की उदयतिथीनुसार 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी करणे योग्य आहे. चला आता जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या पूजेची शुभ मुहूर्त- 
 
23 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त. Dhanteras shubh muhurt 2022:
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी सर्वोत्तम शुभ वेळ: संध्याकाळी 05:44 ते 06:06.
अभिजीत मुहूर्त: सकाळी 11:59 ते दुपारी 12:46 पर्यंत. या मुहूर्तामध्ये पूजा आणि खरेदी दोन्ही करता येईल.
विजय मुहूर्त: दुपारी 02:18 ते 03:05 पर्यंत. या मुहूर्तावर तुम्ही खरेदीही करू शकता.
 
धनत्रयोदशी शुभ योग Dhanteras shubh yog 2022:
सर्वार्थ सिद्धी योग : दिवसभर राहील.
अमृत ​​सिद्धी योग: दुपारी 02:34 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:35 पर्यंत

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments