7 नोव्हेंबरला महालक्ष्मीच्या पूजेचा महापर्व अर्थात दिवाळी आहे. दिवाळीच्या दिवशी केलेल्या पूजेमुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते. जुन्या परंपरेनुसार, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशिष्ट कार्य केले जातात. हे कामं दिवाळीच्या दिवसांमध्ये रोज केले पाहिजे.
1. जर तुम्हाला महालक्ष्मीची कृपा तुमच्या घरात हवी असेल तर मुख्य दरवाज्यावर सूर्यास्तानंतर दिवा लावा. दिवा लावताना देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण हा दिवा लावत आहो हे लक्षात आले पाहिजे. अशी मान्यता आहे की संध्याकाळी महालक्ष्मी पृथ्वीचा प्रवास करते आणि ज्या घरी दारावर देवीच्या स्वागतासाठी दिवे लागलेले असतात, तिथे ती वास करते.
2. दररोज सकाळी घरी गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रच्या वासाने वातावरणात उपस्थित असलेली नकारात्मक ऊर्जा संपते, घरगुती वातावरण पवित्र होत. घरातील वास्तू दोष देखील दूर होतो. ज्या ठिकाणी गोमूत्र शिंपडले जाते, तेथे सर्व देवता आणि देवींचा विशेष कृपा राहते.
3. दररोज मुख्य दारासमोर रांगोळी काढावी. रांगोळीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. रांगोळी देवी व देवतांच्या सन्मान आणि स्वागतासाठी काढली जाते.
4. घरगुती वातावरण सुगंधित असावे. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी छान सुगंधाची धूप किंवा उदबत्ती लावावी. ज्या स्थानी घाण वास येतो तेथे नकारात्मक ऊर्जा असते आणि वास्तू दोष देखील असतात.
5. सदैव घर स्वच्छ ठेवावे. कोणताही कचरा किंवा मकडीचे जाळे नसावे. ज्या घरात अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास राहत नाही. आरोग्यासाठी देखील अस्वच्छ वातावरण हानिकारक आहे.