Marathi Biodata Maker

Vasubaras 2022 : वसुबारस या दिवशी काय नाही करावे ,काय करावे जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (09:42 IST)
आश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते.यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी येणार आहे. गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस. या दिवशी गाईची पाडसासह पूजा करतात. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या गायीला उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी गायीची पूजा करतात. एकवेळ उपास करून संध्याकाळी गायीची पूजा वासऱ्यासह करतात. या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले आहे. चला तर मग जाणून घेऊ या की या दिवशी काय करावे आणि काय करू नये. 
 
काय करू नये-
गोवत्स एकादशीला गहू मूग खात नाही तसेच दूध आणि दुधाचे पदार्थ ,तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य असल्याची आख्यायिका आहे. 
 
काय करावे-
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात होते.
घरी गुरे, वासरे असणार्‍यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक करुन नैवेद्य दाखवला जातो. 
सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.
सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. 
नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. 
निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. 
स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. 
घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. 
 
 
Edited By - Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments