Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diwali Special Balushahi Recipe In Marathi : बाजारासारखी बालुशाही घरीच बनवा

Webdunia
रविवार, 31 ऑक्टोबर 2021 (17:13 IST)
बालुशाही रेसिपी: दीपावलीच्या निमित्ताने सर्वच घरांमध्ये काही गोड पदार्थ तयार केले जातात. या दिवशी घर-घरात गोडधोड बनवून लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाई देतात. या दिवाळीत घराच्या घरी बाजारासारखी बालुशाहीअगदी सोप्या पद्धतीने बनवा. ही बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया बालुशाही घरी बनवण्याची सोपी पद्धत.

साहित्य-
 साखर 500 ग्रॅम,  250 मिली पाणी , केशर ,1 टेबलस्पूनवेलची पूड , 3-4 थेंब लिंबाचा रस, 2 कप मैदा, 1/2 कप तूप ,1/4 चमचे मीठ ,1 टेबलस्पून बेकिंग पाउडर
 
कृती-
सर्व प्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी टाकून गॅसवर गरम करा.
साखर पाण्यात चांगली विरघळली की त्यात केशर, वेलची पूड  आणि लिंबाचा रस घालून मंद आचेवर शिजू द्या.
सरबत तयार झाल्यावर गॅसवरून उतरवा. आता एका पात्रात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.
सर्व साहित्य नीट एकजीव झाल्यावर त्यात तूप घालून पिठात चांगले मिक्स करून घ्या. पिठात तूप चांगले मिसळले की पिठात पाणी घालून मळून घ्या.
आता हाताने बनवलेला गोळा बऱ्याच वेळा कापून ठेवा. असे केल्याने, बालूशाहीचे  थर चांगले तयार होतात.
आता तयार पीठ थोडावेळ झाकून ठेवा. थोड्या वेळाने कणकेचे लहान तुकडे करून त्याचे गोलाकार आकार करून मधून मधून छिद्र पाडा. .
आता कढईत तेल टाकून गॅसवर गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार केलेले गोळे  टाकून तळून घ्या.
सर्व गोळे तळल्यावर ते साखरेच्या पाकात टाका आणि प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवा . बालुशाही खाण्यासाठी तयार. थंड झाल्यावर सर्व्ह करा.
 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments