Dharma Sangrah

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खासगीकरण होऊ देणार नाही, हा शब्द : नितीन राऊत

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (21:43 IST)
राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खासगीकरण होऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू आपण  माझ्या विनंतीला मान देऊन प्रस्तावित संप मागे घ्यावा, असं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत  यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केलं.
 
या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्याला मान्यता दिली. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी आपला संप मागे घेतील, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी यावेळी  व्यक्त केला.
 
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या 27 वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 
 
दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, वीज कंपनी व्यवस्थापनाच्या असंवेदनशील धोरणाला आमचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं. 
 
सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो.
 
तुम्ही बैठकीची वेळ निश्चित करा, शक्य असेल तर उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलावतो. मी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन बैठकीला हजर रहा आणि संप मागे घ्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.  संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका, असंही ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

अर्थसंकल्प वाचवण्यासाठी बुलेट ट्रेन आणि द्रुतगती मार्गांचे प्रकल्प थांबवण्याची रोहित पवार यांची मागणी

१९ वर्षीय नवविवाहितेच्या आर्त विनवणीकडे दुर्लक्ष झाले; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला, नागपूर मधील घटना

भंडारा : साकोली तहसील परिसरात आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचा जळून मृत्यू

पुढील लेख
Show comments