Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मैत्री दिनावर निबंध (Essay on Friendship Day)..

Webdunia
शुक्रवार, 31 जुलै 2020 (19:25 IST)
फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन जे ऑगस्ट महिनाच्या पहिल्या रविवारी दरवर्षी साजरा केले जातो. या दिवसाला मैत्रीला समर्पित करण्यामागे एक गोष्ट किंवा कथा आहे. असं म्हणतात की एकदा अमेरिकेच्या सरकारने एका माणसाला ठार मारले. या माणसाचा एक मित्र होता, ज्याने आपल्या मित्राच्या मरण्यानंतर दुखी होऊन स्वतःचे जीव संपविले. त्यांचा या मैत्रीला सन्मान देत 1935 पासून अमेरिकेत या दिनाला मैत्रीच्या नावी केले आणि अशा प्रकारे फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात झाली.
 
आज फ्रेंडशिप डे संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो, कारण असा एखादाच कोणी माणूस असेल ज्याला मित्र नाही, आणि ज्याला मैत्रीचे महत्त्व ही माहीत नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात कमी किंवा अधिक प्रमाणात मित्र असतात, मित्रांसमवेत घालवलेला वेळ कोणास आवडणार नाही. विशेषतः बालपणातील मैत्री खूप घट्ट असते. ज्याची आठवण कायमची मनात राहते.
 
मैत्री एक असं नातं आहे ज्याला एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार निवडतो. बालपणात नकळत बरीच लोकं मित्र बनून जातात. ज्यामध्ये काही मित्र असेही असतात जे शाळेपासून ते कॉलेजपर्यंत साथ देतात तर काही चांगल्या आणि वाईट काळात देखील आपली मैत्री निभावतात. तथापि असे मित्र फारच कमी असतात जे आयुष्यभर आपली मैत्री जपतात. म्हणून मैत्री करताना आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी.
 
मित्र असे असतात ज्यांचा सहवास आपल्या भविष्यावर प्रभाव टाकतं. वाईट सवय असलेल्या मित्रांचा सहवास आपल्याला आणि आपल्या भविष्याला खराब करण्याची क्षमता राखतो, तर चांगली विचारसरणी आणि चांगल्या सवयी असलेले मित्र आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि आपल्या जीवनाला सुशोभित करण्यास मदत करतात.
 
आजकाल मित्रांना अनेक वर्गात विभागले आहेत जसं की एक सारखा छंद जोपासणारे मित्र, व्यवसायी मित्र, कामाच्या ठिकाणचे मित्र, कामा पूर्तीचे मित्र इत्यादी पण जे खरे मित्र असतात त्यांची आवड निवड एक सारखी असते. ते आपल्याला आयुष्याचा पदोपदी साथ देतात ते नेहमीच आपल्या चांगल्याचा विचार करतात.
 
म्हणून, जर आपल्या आयुष्यात देखील असा कोणी खरामित्र असला, तर मैत्री दिनाच्या या खास प्रसंगी आपल्या त्या खास मित्राला तो खास असल्याची जाणीव नक्कीच करून द्या. या दिवसाला आपल्या जिवलग मित्रांसह साजरा केले जातो. बरेच लोकं आपल्या मित्रांसह साजरा करण्यासाठी विविध योजना आखून हा दिवस साजरा करतात. संपूर्ण दिवस जरी नाही तरी जेवढे शक्य असल्यास आपल्या व्यस्ततेमधून काही क्षण आपल्या मित्रांसाठी नक्की काढावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

Health Alert : शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

तुमच्या आयुष्यासाठी योग निद्रा का महत्त्वाची आहे, जाणून घ्या त्याचे फायदे

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

पुढील लेख