प्रथम आपल्या इष्ट देवतांना हळद-कुंकू वाहून देवापुढे विडा (विडयाची पाने दोन, त्यावर एक नाणं व एक सुपारी) ठेवून देवाला नमस्कार करावा. गुरुजींना नमस्कार करुन घरातील वडील मंडळींना नमस्कार करावा. नंतर आसनावर पूजेसाठी बसून व पूजेला आरंभ करावा .
द्विराचम्य ० पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करुन प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे. चौथ्या नावाचा उच्चार करुन संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन उदक सोडावे. याप्रमाणे दोन वेळा करावे .
१ ) ॐ केशवाय नमः , २ ) ॐ नारायणाय नमः , ३ ) ॐ माधवाय नमः , ४ ) ॐ गोविंदाय नमः , ५ ) ॐ विष्णवे नमः , ६ ) ॐ मधुसूदनाय नमः , ७ ) ॐ त्रिविक्रमाय नमः , ८ ) ॐ वामनाय नमः , ९ ) ॐ श्रीधराय नमः , १० ) ॐ ह्रषीकेशाय नमः , ११ ) ॐ पद्मनाभाय नमः , १२ ) ॐ दामोदराय नमः , १३ ) ॐ संकर्षणाय नमः , १४ ) ॐ वासुदेवाय नमः , १५ ) ॐ प्रद्युम्नाय नमः , १६ ) ॐ अनिरुद्धाय नमः , १७ ) ॐ पुरुषोत्तमाय नमः , १८ ) ॐ अधोक्षजाय नमः , १९ ) ॐ नारसिंहाय नमः , २० ) ॐ अच्युताय नमः , २१ ) ॐ जनार्दनाय नमः , २२ ) ॐ उपेंद्राय नमः , २३ ) ॐ हरये नमः , २४ ) ॐ श्रीकृष्णाय नमः ॥
गणपतीची हात जोडून प्रार्थना करुन नंतर ताम्हणात उदक सोडावे.
वायन देणे असल्यास एकवीस तळलेले मोदक घेऊन त्यातील एक मोदक गणपतीच्या हातावर ठेवून दहा आपल्याकरिता ठेवावे आणि उरलेले दहा मोदक ब्राह्मणाला वायन म्हणून द्यावे.
वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप, दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा. कापूर लावून आरती करावी. पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .
आरती, मंत्रपुष्प व प्रार्थना करुन झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी. वरील गोष्टी गणपतीबरोबर विसर्जनास द्याव्यात.