Friday remedy हा देवीचा वार म्हणजे महालक्ष्मीचा वार आहे.या दिवशी देवीची उपासना करतात व देवीची स्त्रोते वाचतात.हा बालाजीचाही वार आहे.तिरुपतीला बालाजीच्या देऊळात शुक्रवारी गर्दी असते. हा संतोषीमातेचाही वार आहे.संतोषीमातेचे व्रत करणारे लोक सोळा शुक्रवार उपास करतात.दिवसभर आंबट पदार्थ खात नाहीत. संध्याकाळी संतोषीमातेला गूळ व चणे यांचा नैवेद्य दाखवून उपास सोडतात.कुठलेही आंबट पदार्थ दिवसभर खायचा नाही. हा यातला मुख्य नियम आहे. स्त्रियांनी हे शुक्रवार करतांना मासिकपाळी आल्यास उपवास करावा पण तो शुक्रवार धरू (मोजू) नये.
शुक्राचे रत्न हिरा आहे. हा सर्व रत्नांचा राजा आहे. इंद्राचे वज्र याच रत्नाचे आहे. हे रत्न धारण करणारा सर्वांना प्रिय होतो. भूतबाधा, चेटूक, स्वप्ने वगैरेंमुळे आलेला दुबळेपणा या रत्नामुळे जातो व आत्मविश्वास वाढतो. हिरा वापरतांना त्याचा स्पर्श वापरणाऱ्याला झाला पाहिजे. हिरा धारण करणाऱ्याने फायदा न होता उलट संकटे आली तर तो हिरा आपणाजवळ ठेवू नये.
शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्ताचें नियमित पठण करावे.