सर्वप्रथम पूजनीय देवता गणपती भक्तांचे सर्व संकट दूर करतात. गणोशोत्सव दरम्यान भक्त गणेश भक्तीत मग्न असतात अशात देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजन, स्तोत्र पाठ आणि मंत्रोच्चारण करावे. सोबतच गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताचा पाठ करणे फलदायी ठरतं. याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दु:खाचा अंत होतो. सर्व सिद्धी प्राप्त होते. तसेच पाठ करताना पूजन करुन गणरायाला सुगंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. सोबतच गणपतीला प्रिय दूर्वा अर्पित कराव्या. लाल फुलांची माळ अर्पित करावी. याने घरात सुखाचे आगमन होतं. सोबतच उच्चारण स्पष्ट असावं.