Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय एकोणीसावा
Webdunia
बुधवार, 19 जून 2024 (11:28 IST)
॥ श्रीगणेशाय नम: ॥
हरि म्हणे धर्मा नृपती ॥ सोमकांत आख्यान ॥ सांगतों तुजप्रती ॥ ऐकतां वाढे संपत्ती ॥ पुत्रपौत्र धनधान्य ॥१॥
दक्षिण देशाचे ठायीं ॥ सोमकांत राजा असे पाही ॥ त्याची भार्या पद्मावती गेही ॥ पतिव्रता महासती ॥२॥
पुत्र दोघे असती त्यासी ॥ कोकिळा व्रत आले संभ्रमेसी ॥ पद्मावती पुसे रायासी ॥ व्रत करावया आज्ञा द्यावी ॥३॥
तो म्हणे दैवीं असेल ॥ तें घडोनी येईल ॥ आदिमाया झाली पक्षिण ॥ तिचें व्रत न करावें ॥४॥
करसी जरी हें व्रत ॥ तरी मी क्षोभेन निश्चितीं ॥ निंदा करुन अद्भुत ॥ कोकीळाव्रत राहविलें ॥५॥
ऐसी निंदा करितां जाण ॥ कोपली आदिमाया पक्षिण ॥ दायाध्य मिळाले चहुंकडून ॥ ग्राम त्याचे वेढिलें ॥६॥
युध्द केलें बहुत दिन ॥ राज्य घेतलें हिरोन ॥ राज्य स्त्री पुत्रासह वर्तमान ॥ अरण्य पंथे पळोन ॥७॥
निंदा करितां कोकिळेची ॥ ऐसी गती झाली त्यांची ॥ यास्तव कोणे व्रताची निंदा सहसा करुं नये ॥८॥
स्त्री ते राजाची पतीव्रता ॥ भयाभित पळालि तत्वतां ॥ राजा याची चुकामुक होतां ॥ खेद करी तेव्हांते ॥९॥
दोघें मुलें घेऊन ॥ सोमकांत हिंडे रानोरान ॥ पुढें गहन अरण्य देखोन ॥ नंदी दुर्धर देखिला ॥१०॥
मग त्या दोघां मुलासी घेऊन ॥ एका नगरांत येवोन ॥ मुलांस तेथें ठेऊन ॥ आपण गेला अनुष्ठाना ॥११॥
श्रीकृष्ण म्हणे धर्मा एक ॥ सोमकांत रायाचें कौतुक ॥ तप केलें तेणें अद्भुत ॥ परंतु शंभु प्रसन्न न होयेची ॥१२॥
पार्वती म्हणी शंकरास ॥ वर द्यावा स्वामि सोमकांतास ॥ शंभु म्हणी त्यास अपेश ॥ कोकिळाव्रत निंदिलें ॥१३॥
यास्तव सर्वथा माझें मन ॥ वर द्यावय नव्हे सुप्रसन्न ॥ मग पार्वती माता बळें करुन ॥ घेऊन गेली शिवापाशीं ॥१४॥
शंभु रुप धरि जें सहज ॥ जटिळ गोसावी झाले महाराज ॥ पुढें देखोनी भुभुज ॥ दर्शनासी प्रवर्तले ॥१५॥
शंभु अंमगळ तापसी ॥ त्याचे ध्यान तूं करशी ॥ तूझे मनोरथ निश्चियेसी ॥ शंभुचेनी तृप्त नव्हे ॥१६॥
लक्ष्मीपति नारायण ॥ त्याचें करावें आराधन ॥ सौभाग्यदायक लक्ष्मी पूजन ॥ तेणें भाग्यासी पावसील ॥१७॥
त्या विष्णुचें चिंतन ॥ करावें आवडी धरुन ॥ ऐसें ऐकातांची वचन राजा तेव्हां कोपला ॥१८॥
म्हणे तापसा चांडाळा ॥ शिवनिंदका अमंगळा ॥ आमुचा हेत आगळां ॥ शंभु चरणीं अक्षयीं ॥१९॥
भगवीं वस्त्रें घेतलीं ॥ शिवाची त्वां निंदा केली ॥ व्यर्थ जननी प्रसवली ॥ तू गोसावी म्हणोनी रक्षिलें ॥२०॥
नाही तरी शिक्षा लाऊन ॥ काढून देतों न लागातां क्षण ॥ मग जटील वेश टाकून ॥ मग साक्षात आपण प्रगटले ॥२१॥
म्हणे झालों प्रसन्न राजेंद्रा ॥ येरू चरणीं त्वरें लागला ॥ म्हणी अन्याय मजपासून जाहला ॥ अवाक्षर मी बोललों ॥२२॥
मग सोमकांत राजेश्वर ॥ म्हणे शंभु कर्पूरगौर ॥ पद्मावती भार्या सुंदर ॥ दोघे पुत्र भेटवी ॥२३॥
प्रसन्न होवोनी शूळपाणी ॥ म्हणे सत्वर भेटती पुत्रकामिनी ॥ राजा आनंदला मनीं ॥ प्रसाद ऐसा शंभुचा ॥२४॥
तेव्हा शंभु गुप्त जाहले ॥ राजानें तप आटोपिलें ॥ पुढें अपूर्व वर्तलें ॥ ते कथा परिसावी ॥२५॥
राजाने दोघां पुत्रास ॥ नेऊन घातलें ज्या नगरांत ॥ तेथें येता झाला सोमकांत ॥ शंभुवरदे करुनी ॥२६॥
तंव त्या नगरांत दोघे जण ॥ पोटें भरती चाकरी करुन ॥ ऐसें होतां बहुदिन ॥ ओळख परस्परें मोडली ॥२७॥
तेव्हां त्या नगरीचा राजा ॥ पाळीत असे सुखें प्रजा ॥ शरीरीं व्यथा उद्भवली सहजा ॥ तेणे मृत्यु पावला ॥२८॥
त्याच्या राज्यास नाही धनी ॥ त्या राजाची राजपत्नी ॥ तप करितां शूळपाणी ॥ प्रसन्न होवोनी सांगत ॥२९॥
गज शुंडात माळ देऊन ॥शाण्णव कुळीचें राजनंदन ॥ अणिकही इतर जन ॥ तेथें हो आणावें ॥३०॥
राजपत्नीस म्हणे दयाळ ॥ ज्याचे कंठी पडेल माळ ॥ तोच होईल भूपाळ ॥ सत्यसत्य जाण तूं ॥३१॥
शंभु असे सांगतां ॥ घरास आली राजकांता ॥ बोलाऊनी राजया समस्तां ॥ आणखीही इतर लोक ॥
बोलवती झाली अपूर्व ॥३२॥
गजशुंडें देऊन माळ ॥ ही पडेल ज्याच्या गळां ॥ तोच होईल राज्य सोहळा ॥ वचन सत्य त्रिवाचा ॥३३॥
मग गजशुंडेंत माळ दिघली ॥ तिनें सोमकांताच्या गळां घातली ॥ जय जयकार ते काळीं ॥ परमानंद जाहला ॥३४॥
राज्यलाभ ऐसा जाहला ॥ राजा मनी आनंदला ॥ दोघे पुत्र तयाला ॥ पूर्वीच होत नगरांत ॥३५॥
चाकरी राजमंदिरी दोघांस ॥ परस्परें ओळखी नसे राजास ॥ ऐसे लोटतां कांही दिवस ॥ पुढें काय वर्तलें ॥३६॥
सुंदर कामिनी पद्मावतू ॥ अरण्यांत पडली होती ॥ एके वणीके अवचित्तीं देखिली तेव्हां बहु सुंदर ॥३७॥
तो ते करती झाली कोकिळाव्रत जाण ॥ उपदेश केला शिवें आपण येऊन ॥ तंव तो वाणी सधन ॥
येता झाला तया स्थान ॥३८॥
तेणें तीस पाहतां गेला भुलोन ॥ म्हणे ईस करावी कामीन ॥ ते म्हणी बारा वर्षे पूर्ण ॥ नेम माझा व्रताचा ॥३९॥
बारा वर्षे झालीयावरी ॥ मग मी स्त्री तुझी निर्धारीं ॥ वाणी म्हणे गोष्ट बरी ॥ झालें बहुत अपूर्व ॥४०॥
जेथें सोमकांत राज्य करीत ॥ तेथील तो वाणी रहात होता ॥ पहा कर्माची कैसी गती ॥ पद्मावती समागमे ॥४१॥
धन पुष्कळ वणीका जवळी ॥ राजास म्हणे करी रखवाली ॥ राजयानें ते दोघे पुत्र जवळी ॥ वणीक रक्षणा पाठविले ॥४२॥
ते पुत्र असती राजयाचे ॥ परी राजया ठाऊक कैंचें ॥ रक्षण करिता वणीकाचें ॥ रात्रीं त्यास करमेना ॥४३॥
धाकटा बंधू बोलता जाहला ॥ आपुला पिता कोठें गेला ॥ तो म्हणे नदींत वाहवला ॥ जितकां मृत्यु नसे कोठें ॥४४॥
माता अपुली पद्मावती ॥ तिची कैसी झाली गती ॥ सोमकांत पिता नृपती ॥ तोही कोठें कळेना ॥४५॥
तो वडील बंधु बोलत ॥ आपुला पिता सोमकांत ॥ आपुले येथील झाला नृपनाथ ॥ ऐसें जन बोलती ॥४६॥
आपण असतां लहान ॥ तेव्हां गेला टाकून ॥ ओळखी नसे संपूर्ण ॥ यास कैसें करावें ॥४७॥
ऐशा गोष्टी ऐकून ॥ पद्मावतीस पान्हा आला भरुन ॥ मग त्या मुलांस बोलावून ॥ भेटती झाली कडकडोनी ॥४८॥
मीच पद्मावती तुमची माता ॥ सोमकांत नृपती तुमचा पिता ॥ पूर्वपुण्य अवचितां ॥ भेट झाली आजी पैं ॥४९॥
बुडतां जहाज कडे लागलें ॥ की मरतया अमृत जोडिलें ॥ कीं चोरी लुटितां धांवणें ॥ पाठिराख्याचे ते काळीं ॥५०॥
आतां हे असोत उपचार ॥ माते शोक न करावा फार ॥ सोमकांत पिता नृपवर ॥ याची ओळख कैसी होय ॥५१॥
तेव्हां बोले पद्मावती ॥ राजमुद्रिका माझ्या हातीं ॥ ह्या देतां राजाप्रती ॥ तात्काळ ओळख पुरेल ॥५२॥
उभयतां बंधु मुद्रिका घेऊन ॥ गेले तेव्हां राजदर्शना ॥ मुद्रिकापुढें ठेऊन ॥ बुध्दांजुळी उभे राहती ॥५३॥
राजयास मुद्रिका दिधल्या ॥ त्यानें तात्काळ ओळखिल्या ॥ चांडाळें वधिलें पद्मावतीला ॥ वणिकासी लुटितां पूर्ण ॥
अपार द्रव्य प्राप्त जाहलें ॥५४॥
ती तो वणीक गृही असे ॥ मग वणीका बोलावून ॥ पद्मावती घेतली हिरोन ॥५५॥
कोकिळाच्या प्रसादें ॥ वर्तमान पद्मावतीस सांगतां सहजें ॥ म्हणें शंभु कैलासराजे ॥ प्रसाद हा त्याचा ॥५६॥
ऐसा व्रताचा महिमा ॥ पुत्र भेटले उभयालागी जाण ॥ दुग्ध धारा चालिल्या पूर्ण ॥ मुखीं दोघांच्या प्रवेशला ॥५७॥
पापदृष्टी वाणी बोलिला ॥ म्हणून सोमकांते लुटिला धर्मवासना असती तयाला ॥ तरी नांदतां अक्षयीं ॥५८॥
इति श्रीस्कंदपुराणे ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ एकोणविंशतितमोऽध्याय: ॥१९॥ ओंवी ॥५८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभंभवतु ॥
॥ अध्याय १९ वा समाप्त: ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय अठरावा
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सतरावा
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सोळावा
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय पंधरावा
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय चौदावा
सर्व पहा
नवीन
श्री दत्तगुरुशरणाष्टकम्- दत्तात्रेया तव शरणं
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया
रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?
मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती
Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी
सर्व पहा
नक्की वाचा
Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?
Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?
वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील
बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा
पुढील लेख
श्री कोकिळा माहात्म्य अध्याय अठरावा
Show comments