नंद आणि समस्त मंडळी । येऊनि पावतांचि गोकुळीं । सीमान्तस्थळीं एक्या मेळीं । सर्व जन राहिले १ पुढें अक्रूर जाऊनि वेगें । कंसासी समाचार सांगे । इकडे बलराम कृष्ण दोघे । नगरशोभा देखती २ रामकृष्णांची थोर कीर्ती । मथुरेमाजीं प्रकटली होती । म्हणूनि ऐशा दिव्य विभूती । देखावयाकारणें ३ लोटला...