पंचमाध्यायींचेम कथानक । परीक्षितीसि सांगे शुक । त्या कथेंचे कौतुक ऐका तुह्मी सादर ॥१॥ स्वधर्माचरण सद्वरर्तन । यांपासूनि होय कल्याण । एतदर्थ पुरातन आख्यान एक परिसावें ॥२॥ शर्याति नामें एक राजा । सुकन्या नामें त्याची तनुजा । सुवर्णचंपकावरी तेजा । लाधली ते सुदैवें ॥३॥ शर्याति नृप एके दिनीं । कन्येसह...