श्रीगणेशाय नम: ॥ येरीकडे दळभार । देखोनि चालिले यादववीर । लोटले येरयेरांसमोर । घायें निष्ठुर हाणिती ॥ १ ॥ दक्षिणराजे निजभारीं । युद्ध पाहती राहोनि दूरी । रुक्मिया क्षीण केला हरी । कृष्णावरी उठावले ॥ २ ॥ उरलें रुक्मियाचें दळ । यादवीं त्रासिले प्रबळ । वर्षोनियां बाणजळ । वीर सकळ...