श्रीगणेशाय नम: ॥ यापरी कृष्णपत्नी । रामें प्रबोधिली वचनीं । रुक्मिया दिधला सोडोनी । विरूपपणीं सलज्ज ॥ १ ॥ दीन हीन गेली कळा । वीर्यशौर्य मुकला बळा । केवीं मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ॥ २ ॥ पित्यानें म्हणीतलें नपुंसक । त्या वचनाचें थोर दु:ख । दाविता त्रूपतेचें...