श्रीगणेशाय नम: । कृष्णासी शरीरसंबंध । हा तंव बोलचि अबद्ध । वडीलपणें घेतला छंद । बुद्धिमंद म्हातारा ॥ १ । कृष्णासी सोयरिक न ये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा मारिला अहंमामा । तो काय आम्हां धड होईल ॥ २ ॥ एक म्हणती नंदाचा । एक म्हणती...