संत कान्होपात्रा या 15 व्या शतकातील मराठी संत कवयित्री असे.यांचा जन्म पंढरपुर जवळ मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला. शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अश्या या शामा नर्तिकेच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला आली. तीचे नाव कान्होपात्रा असे ठेवले .चंद्राच्या कलेप्रमाणे कान्होपात्रा हळुहळु मोठी झाली .पण पुर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला लहानपणापासुनच विðलाच्या भक्तिीची ओढ होती. गावातील वारकऱ्यासमवेत ती पंढरपुरी जात असे त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे न्यावा असे विचार कधीही त्यांच्या मनात आले नाही. कान्होपात्रा यांनी मराठी ओव्या आणि अभंग लिहून विठ्ठलावर असणारी त्यांची भक्ती सांगितली आहे. त्यांनी लिहिलेले एकूण तीस अभंगे आजही गायले जातात.
एके दिवशी पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला जातांना वारीत कान्होपात्रेला संतसंग लाभला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संत संगतीमुळे ती पुरती बदलली आणि तिच्या आयुष्यात सुध्दा आमुलाग्र बदल घडला. सतत हरिनामात दंग राहाणे आणि किर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.भक्तांच्या सहवासात पंढरीला पोहोचून विठ्ठलाचे दर्शन नेहमी मंदिराच्या दारातून घेत असे.
एके दिवशी बिदरच्या एका माणसाने तिला पाहून तिच्या रूपाचे वर्णन बादशहा कडे केले. राजाचे रक्षक तिच्या सौंदर्याची माहिती ऐकून तिला आणायला राजाच्या आज्ञानुसार घेण्यासाठी आले. त्यांनी कान्होपात्राला त्यांच्या बरोबर येण्याचे म्हटले. जर राजाचे आदेश ऐकले नाही तर तिला बळजबरी न्यावे लागेल असे सांगितले. त्यावर तिने मी विठ्ठलाची भेट घेईन नंतर तुमच्यासोबत येईन असे सांगितले आणि विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाला म्हटले जर मला राजाकडे जावे लागले तर याचा दोष तुमच्यावर येईल. मला या संकटापासून वाचवा. यावर स्वतां : विठ्ठलाने कान्होपात्राच्या देहातून तिचे प्राण घेतले आणि आत्मा स्वतःमध्ये विलीन केली.कान्होपात्राने विठ्ठलाच्या चरणी देहत्यागला. विठ्ठलाने पुजाऱ्या सांगितल्याप्रमाणे तिचे प्रेत मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाज्यावर पुरले. तिला पुरल्यावर त्या ठिकाणी एक झाड आले. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात आजतायागत ते झाड आहे. राजाच्या रक्षकांनी कान्होपात्राचे काय झाले असे विचारल्यावर त्याने घडलेले सर्व सांगितले .राजालापुजाऱ्याला अटक करून राजाच्या समोर नेण्यात आले असता त्याने राजाला नारळ प्रसाद म्हणून दिला. आणि घडलेलं सांगितले. राजाने नारळात केस बघितले आणि राजाने नारळात केस कसे आले विचारल्यावर पुजाऱ्याने विठ्ठलाचे केस असल्याचे सांगितले आणि स्वतःच्या डोळ्याने बघण्यास सांगितले. राजाने स्वतः पंढरपूर जाऊन विठ्ठलाचे रूप बघितल्यावर त्याला कान्होपात्रा विठ्ठलात एकरूप झाल्याचे पहिले. त्याला स्वतःची चूक समजली आणि त्याने विठ्ठलाला साष्टांग दंडवत केले.
संत कान्होपात्रा अभंग-
विठू दीनांचा दयाळ ।
वागवी दासाची कळकळ ।।१।।
देव कृपावंत मोठा ।
उणें पडों नेदी तोटा ।।२।।
देव भक्तांचा अभिमानी ।
वाहे चिंता सकळ मनीं ।।३।।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रा आनंद झाला ।।४।।
संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आहे -
“नको देवराया अंत आता पाहु।
प्राण हा सर्वता जावू पाहे।।
हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले।
मजलागी जाहले तैसे देवा।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी।
धावे वो जननी विठाबाई।।
मोकलूनी आस झाले मी उदास।
घेई कान्होपात्रेस हृदयास।।”
“योगिया माजी मुगुट मणी। त्रिंबक पाहावा नयनी।।
माझी पुरवावी वासना। तू तो उध्दराच राणा।।
करूनिया गंगा स्नान। घ्यावे ब्रम्हगिरीचे दर्शन।।
कान्होपात्रा म्हणे पंढरीराव। विðल चरणी मागे ठाव।।”