rashifal-2026

Sant Narahari Sonar death anniversary 2025 संत नरहरी सोनार पुण्यतिथी

Webdunia
शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (06:26 IST)
Sant Narahari Sonar death anniversary 2025 : महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली असून आजही अनेक काळ गेल्यानंतर संतांची शिकवण महाराष्ट्र भूमीला मार्गदर्शक आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी भक्तिमार्गाचा मळा फुलवला आहे. नामस्मरणाचे महत्व अत्यंत सुंदर अश्या शब्दांमध्ये संतांनी सांगितले आहे. अभंग, भारुडे, गवळणी यांसारखे साहित्य आजही अनेकांना मार्गदर्शन करते तसेच जीवन जगण्याचा सोपा मार्ग प्रकट करते. तसेच या संत मंडळींमध्ये एक संत असे होते ज्यांनी भगवान शिवाला आपले सर्वस्व मानले होते. ते म्हणजे संत नरहरी सोनार होय. संत नरहरी सोनार यांचा जन्म 1313 मध्ये श्री पंढरपूर येथे अच्युत बाबा आणि सावित्रीबाई यांच्या पोटी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष त्रयोदशीला अनुराधा नक्षत्रात सवंत शके 1115 च्या पहाटे झाला. अच्युत बाबा आणि सावित्रीबाई यांच्या पोटी जणू रत्न जन्मले होते. संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनाव सोनार होते. संत नरहरी सोनार यांच्या घरी परंपरेने शंकराची पूजा चालू व्हायची. संत नरहरी यांचे वडील हे मोठे शिवभक्त होते.
ALSO READ: नीम करोली बाबांप्रमाणे या ३ गोष्टी ताबडतोब सोडून द्या, लवकरच यश आणि संपत्ती मिळेल
 तसेच संत नरहरी यांच्या बालपणात त्यांच्याकडे अनेक शिवस्तोत्रे होती व त्यांनी मनापासून ती पाठ केली होती तसेच ते पुराणातील कथा देखील मोठ्या आनंदाने ऐकत असत पुराणांमध्ये त्यांना फक्त भगवान शंकर आवडत असे. हळूहळू त्यांची शिवपूजा वाढत गेली व ते फक्त भगवान शंकरावरच विश्वास ठेऊ लागले. एके दिवशी आई-वडिलांनी त्यांना बोलावून सांगितले की नरहरीची आम्हा दोघांची एक इच्छा आहे की तुला लग्न करायला पाहिजे. आता नरहरी यांना काळजी वाटली पण त्यांनी विचार केला की आई वडील आता म्हातारे होत आहे. यावर ते म्हणाले की, मी तुमच्या आदेशाचे पालन करीन, पण माझी एक अट आहे. बाबा संसार करताना माझ्या शिवभक्तीत माझी पत्नी अडथळा बनू नये. यावर वडील म्हणाले ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी अशी शिवभक्ती मुलगी पाहू. तुम्ही आमची अमूल्य संपत्ती आहे, ती जी मुलगी स्वीकारेल, आम्हालाही त्याच मुलीला सून म्हणून बघायचे आहे. तसेच काही दिवसातच नरहरीजींचा गंगा नावाच्या एका साध्या मनाच्या मुलीशी विवाह झाला. संत नरहरी आणि त्यांची पत्नी दोघेही आनंदाने देवाची सेवा करत असत. नरहरी रोज सकाळी स्नान करून शिवालयात जात असे, तोपर्यंत त्यांची पत्नी पूजेची तयारी करत असे. नरहरीच्या भक्तीत ती कधीच अडथळा ठरली नाही. त्यांची सेवा आणि उपासना पाहून प्रभावित होऊन संत नरहरीचे अखंड ॐ नमः शिवाय नामस्मरण करत अनेक लोक त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाले. ते पंढरपुरात खूप प्रसिद्ध झाले.
ALSO READ: Sant Sewalal Maharaj Jayanti 2025 संत सेवालाल महाराज
तसेच कालांतराने संत नरहरी यांचे आई-वडील वृद्ध व अपंग झाले. श्री शिवाच्या नावाचे स्मरण करून आई-वडिलांनी पंढरपूरजवळील कोराटी नावाच्या ठिकाणी देहत्याग केला. संत नरहरी कधीच विठ्ठलाच्या मंदिरात जात नसत. तसेच कृष्ण मंदिरात जात नसत.ते फक्त भगवान शिवाला मानत असत. तसेच त्यांना इतर देवांच्या मंदिरात जायला आवडत नसे. सर्व त्यांना सांगत असत की, देव एकच आहे फक्त त्याच्या नावात आणि रूपात फरक आहे हे अनेकजण त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत, पण नरहरी यांना आवडायचे नाही. भगवान श्री शिव आणि श्री कृष्ण हे एकच आहे, याची जाणीव नरहरीला करून दिली पाहिजे अशी गोष्ट एके दिवशी भगवान शिव आणि विठ्ठलाच्या मनात आली. आता त्यांनी आपल्या भक्ताचे ज्ञानाचे डोळे उघडायचे ठरवले. एकदा नरहरी यांच्या दुकानात एक श्रीमंत सावकार आला. सावकर म्हणाले की, आम्हाला एक मुलगा  रत्न झाला आहे. यावर संत नरहरी म्हणाले की, ही भगवान शिवाची कृपा आहे. सावकार म्हणाले की, नाही नाही, ही तर भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाची कृपा आहे. आम्ही भगवान पांडुरंगांना सांगितले होते की आमच्या घरी मुलगा झाला तर आम्ही तुमच्यासाठी सोन्याचा पट्टा बनवू. आता पुत्र जन्माला आल्याने आम्हाला पांडुरंगाच्या कंबरेसाठी दागिने तयार करण्याची इच्छा आहे. यावर संत नरहरी म्हणाले की, हे चांगले आहे व पंढरपुरात अनेक सोनार आहे. तुम्ही त्यांच्या काढून कंबरेचे आभूषण बनवून घ्या. सोन्याचा पट्टा बनवण्यासाठी आधी माप घ्यावे लागेल आणि त्याकरिता मंदिरात जावे लागेल. मी   भगवान शिव यांच्याशिवाय कोणत्याच मंदिरात जात नाही असे संत नरहरी सावकाराला म्हणाले. सावकाराने खूप त्यांना समजावले पण संत नरहरी यांना पटले नाही. शेवटी सावकार म्हणाले की तुम्ही पंढरपुरात अत्यंत कुशल कारागीर म्हणून प्रसिद्ध आहे. हा अलंकार तुमच्या हातांनी घडवावा ही माझी इच्छा होती, म्हणूनच मी तुम्हाला ते बनवायला सांगितले होते. तसेच संत नरहरी म्हणाले पण मी शिवमंदिर सोडून इतर कोणत्याही मंदिरात प्रवेश करत नाही.त्याचवेळी सावकाराला कल्पना सुचली आणि ते म्हणाले मी भगवान पांडुरंगाच्या कंबरेचे माप आणतो. त्याच मोजमापातून तयार केलेले कंबर पट्टा बनवून द्या. यावर संत नरहरी म्हणाले की, तुमच्या शब्दांचा आणि इच्छेचा आदर करण्यासाठी आम्ही हे दागिने बनवण्याचे काम हाती घेतो. परमेश्वराच्या कंबरेचे मोजमाप झाले आणि नरहरी सोनार यांनी दागिने बनवण्याचे काम सुरू केले. नरहरीने एक सुंदर रत्न जडलेला कंबरेचा पट्टा तयार करून दिला.सावकाराच्या घरी महापूजेची तयारी सुरू झाली.महापूजा पूर्ण झाली आणि सावकाराने कंबरेचे दागिने देवाला घालायला नेले, पण ते चार बोटे लांब होते. सावकाराने आपल्या एका नोकराला कंबरेचा पट्टा घेऊन संत नरहरी सोनारकडे पाठवले. नोकर संत नरहरी यांना म्हणाला की, कंबर पट्ट्याची चार बोटे वाढली आहे, चार बोटे कमी करून द्या. संत नरहरी यांना आश्चर्य वाटले, त्यांनी कंबरपट्टा चार बोटे कमी करून दिला. पण पुन्हा तो पट्टा भगवान पांडुरंगाच्या कमरेला बांधायला सुरुवात केली, काय नवल! कंबरेचा पट्टा चार बोटांनी कमी. आता सावकार स्वतः नरहरी सोनार यांच्या दुकानात गेले व म्हणाले हा कंबरेचा पट्टा चार बोटांनी कमी पडला आहे. यावर संत नरहरी सोनार म्हणाले भगवान शिवाला साक्षी मानून मी दागिने दिलेल्या मापानुसार बनवले आहे असे सांगतो. यावर सावकार म्हणाले मी पण भगवान पांडुरंगांना साक्षी मानतो आणि म्हणतो की आधी दागिने चार बोटे जास्त आणि आता चार बोटे कमी होते. आता तुम्ही स्वतः मंदिरात या आणि कमरेचा पट्टा बांधा. हे पाहून नरहरीजी म्हणाले मी माझ्या निश्चयानुसार दुसरा कोणताही देव पाहणार नाही. पण संत नरहरी म्हणाले तुम्ही माझे डोळे बांधून मला मंदिरात घेऊन जा. दोघेही मंदिरात पोहोचले आणि नरहरी सोनार यांनी माप घेण्यासाठी हात ठेवला. त्याला स्पर्श करताच काहीतरी विचित्र वाटले. त्याच्या कंबरेला स्पर्श केल्यावर ते वाघाचे कातडे असल्याचा भास झाला. थरथरत्या हातांनी त्याने परमेश्वराच्या इतर भागांना स्पर्श केला. आश्चर्य! एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात त्रिशूलाचा स्पर्श त्यांना जाणवला. त्याने गळ्यात हात घेतला तेव्हा सापाने त्याला स्पर्श केला. यावर नरहरी म्हणाले हा विठ्ठल नाही, हे साक्षात शिवशंकर दिसत आहे. त्यांनी डोळ्याची पट्टी काढली आणि पाहिले तर समोर विठ्ठल प्रकट झाले.
ALSO READ: गजानन महाराज आवाहन
त्याने पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली आणि पट्टा बांधायला सुरुवात केली, पण पुन्हा त्याला वाघाचे कातडे, कमंडल, त्रिशूल आणि नाग यांचा स्पर्श झाला. त्याने डोळ्याची पट्टी उघडली तेव्हा त्याला पुन्हा पांडुरंग विठ्ठल दिसला आणि अचानक त्यांना हरि-हर एकच असल्याचे दर्शन झाले. संत नरहरी सोनारांनी विठ्ठलाचे पाय धरले व त्यांचा सर्व अहंकार विरून गेला. पुढे त्यांना श्री शिवामध्ये श्री विठ्ठल आणि श्री विठ्ठलामध्ये श्री शिव दिसू लागले.

श्री नरहरी सोनार यांनी देवाची माफी मागितली आणि सांगितले की आपल्या मनातील अंधार आता कायमचा दूर होऊ शकेल. सर्व जगाला हरिहर एकता दाखवण्यासाठी भगवान श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग प्रकट झाले आहे. तसेच संत नरहरी सोनार यांनी पुढे आयुष्यभर श्री विठ्ठल, मल्लिकार्जुन आणि देवी बागेश्वरीची उपासना केली. लोकांनी त्यांना मोठ्या आदराने आणि प्रेमभावनेने संत ही उपाधी दिली. संत नरहरी सोनार यांनी नामस्मरणाचे महत्व पटवून दिले, विठ्ठलभक्तीचा प्रचार केला.

तसेच माघ वद्य तृतीया सोमवारी शके 1207 (इ. स. 1285) संत नरहरी सोनार यांनी भगवान श्री मल्लिकार्जुनाला नमस्कार केला, त्यांच्या कुटुंबियांची शेवटची भेट घेतली, त्यांच्या पारंपारिक निवासस्थानाला नमन केले आणि विठ्ठल नामाचा उच्चार करताना संत नरहरी परमेश्वरात विलीन झाले. संत नामदेवांनी लिहिले आहे की, संत नरहरी देवाची शोभा बनले आहे.

Edited By- Dhanashri Naik<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Dhulandi 2026: धुळेंडीवर काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या खास गोष्टी

Dhulivandan 2026 wishes in marathi धुलीवंदनाच्या शुभेच्छा संदेश मराठी

ग्रहणबद्दल नियम व माहिती

काळूबाईची आरती Kalubai Aarti

Chandra Grahan Mantra Jaap In marathi चंद्रग्रहणाच्या वेळी कोणता मंत्र जपावा?

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments