Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋषी पंचमी : सप्तऋषि किती आहेत, जाणून घेऊ या जे आपणांस माहीत नसेल..

Webdunia
बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (14:55 IST)
भारतीय ऋषी -मुनींनी या पृथ्वीवर धर्म, समाज, शहर, ज्ञान, विज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष, वास्तू, योग इत्यादी ज्ञानांचे प्रसार केले. जगातील सर्व धर्म आणि विज्ञानातील प्रत्येक क्षेत्राला भारतीय ऋषींचे ऋणी असले पाहिजे.त्यांचा योगदानाला स्मरले पाहिजे. त्यांनी मानवासाठीच नव्हे तर प्राणी-पक्षी, समुद्र, नदी, डोंगर आणि झाडे या सर्वांचा विचार केला आणि सर्वांच्या सुरक्षित जीवनासाठी कार्य केले. चला, आपण थोडक्यात जाणून घेऊ या की कोणत्या काळात कोणते ऋषी होते.
 
ऋषींची संख्या फक्त सातच का?
सप्त ब्रह्मर्षी, देवर्षी, महर्षी, परमर्षय:
कण्डर्षिश्च, श्रुतर्षिश्च, राजर्षिश्च क्रमावश:
अर्थात 1. ब्रह्मर्षी  2. देवर्षी 3. महर्षी 4. परामर्षी 5. काण्डर्षि 6. श्रुतर्षि आणि 7. राजर्षी- हे 7 प्रकाराचे ऋषी असतात. म्हणून ह्यांना सप्तर्षी म्हणतात.
 
सप्तऋषीं तारामंडळ : आकाशात 7 ताऱ्यांचा एक मंडळ दिसतो त्यांना सप्तऋषींचे तारामंडळ म्हणतात. या व्यतिरिक्त सप्तऋषींपासून त्या 7 तारांचा आभास होतो जे ध्रुव ताऱ्याचा सभोवती फिरतात. या तारामंडळातील ताऱ्यांचे नाव भारताच्या 7 महान संतांच्या नावावर आहे. वेदांमध्ये या मंडळाची स्थिती, वेग, अंतर आणि व्याप्तीबद्दल सविस्तर चर्चा केली आहे.
 
भारतात ऋषी आणि गुरु-शिष्यांची परंपरा दीर्घकालापासून आहे. ब्रह्माचे मुलं देखील ऋषी होते तर भगवान शिवाचे शिष्यगण देखील ऋषीच असे. प्रथम मनू स्वयंभू मनूपासून ते बौद्धकाळापर्यंत ऋषी परंपरेची माहिती मिळते. हिंदू पुराणांनी वेळ(काळ) मन्वंतरामध्ये विभागले आहे आणि प्रत्येक मन्वंतरात ऋषींनी केलेले योगदान आणि त्यांचा ज्ञानाबद्दलची व्याख्या केली आहे. प्रत्येकी मन्वंतरात प्रामुख्याने 7 ऋषी झाले आहे. विष्णुपुराणानुसार त्यांची नामावली खालील प्रमाणे आहे-
 
1 प्रथम स्वयंभू मन्वंतरात - मरीचि, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु आणि वशिष्ठ.
2 द्वितीय स्वारोचिष मन्वंतरात - ऊर्ज्ज, स्तंभ, वात, प्राण, पृषभ, निरय आणि परीवान.
3 तृतीय उत्तम मन्वंतरात - महर्षी वशिष्ठांचे सात ही मुले.
4 चतुर्थ तामस मन्वंतरात - ज्योतिर्धामा, पृथु, काव्य, चैत्र, अग्नी, वनक आणि पीवर.
5 पंचम रैवत मन्वंतरात - हिरण्यरोमा, वेदश्री, ऊर्ध्वबाहु, वेदबाहु, सुधामा, पर्जन्य आणि महामुनि.
6 षष्ठ चाक्षुक मन्वंतरात - सुमेधा, विरजा, हविष्मान, उत्तम, मधू, अतिनामा आणि सहिष्णू.
7 वर्तमान सप्तम वैवस्वत मन्वंतरात - कश्यप, अत्रि, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज.
 
भविष्यात -
1 अष्टम सावर्णिक मन्वंतरात -  गालव, दीप्तिमान, परशुराम, अश्वत्थामा, कृप, ऋष्यश्रृंग आणि व्यास.
2 नवम दक्षसावर्णि मन्वंतरात - मेधातिथि, वसू, सत्य, ज्योतिष्मान, द्युतिमान, सबण आणि भव्य.
3 दशम ब्रह्मसावर्णि मन्वंतरात - तपोमूर्ती, हविष्मान, सुकृत, सत्य, नाभाग, अप्रतिमौजा आणि सत्यकेतु.
4 एकादश धर्मसावर्णि मन्वंतरात - वपुष्मान्, घृणि, आरुणि, नि:स्वर, हविष्मान्, अनघ आणि अग्नितेजा.
5 द्वादश रुद्रसावर्णि मन्वंतरात - तपोद्युति, तपस्वी, सुतपा, तपोमूर्ती, तपोनिधी, तपोरति आणि तपोधृति.
6 त्रयोदशा देवसावर्णि मन्वंतरात - धृतिमान, अव्यय, तत्वदर्शी, निरुत्सुक, निर्मोह, सुतपा आणि निष्प्रकम्प.
7 चतुर्दश इंद्रसावर्णि मन्वंतरात - अग्नीध्र, अग्नी, बाहु, शूची, युक्त, मगध, शुक्र आणि अजित. 
 
या ऋषींमधून काही ऋषी कल्पांत -चिरंजीवी, मुक्तात्मा आणि दिव्यदेहधारी असे.
 
'शतपथ' ब्राह्मणानुसार
1. गौतम 2. भारद्वाज 3. विश्वामित्र 4. जमदग्नी 5. वसिष्ठ 6. कश्यप आणि 7. अत्रि.
 
'महाभारतानुसार’
1. मरीचि 2. अत्री 3. अंगिरा 4. पुलह 5. क्रतु 6. पुलस्त्य आणि 7. वशिष्ठ सप्तर्षी मानले जाते.
 
महाभारतात राजधर्म आणि धर्माच्या प्राचीन आचार्यांची नावे खालील प्रकारे आहेत - बृहस्पती, विशालाक्ष (शिव), शुक्र, सहस्राक्ष, महेंद्र, प्राचेतस मनू, भारद्वाज आणि गौरशिरस मुनी.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात यांची यादी या प्रकारे आहे - मनू, बृहस्पती, उशनस (शुक्र), भारद्वाज, विशालाक्ष (शिव), पराशर, पिशुन, कौणपदंत, वातव्याधी आणि बहुदंती पुत्र.
वैवस्वत मन्वंतरात वशिष्ठ ऋषी झाले. त्या मन्वंतरात त्यांना ब्रह्मर्षीची पदवी मिळाली. वशिष्ठाने गृहस्थाश्रम सांभाळताना ब्रह्माजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सृष्टी वर्धन, संरक्षण, यज्ञ इत्यादीने जगाला दिशा दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments