Festival Posters

Ramayana भगवान रामाला उष्टी बोरं खाऊ घालणारी शबरी कोण होती?

Webdunia
शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 (16:37 IST)
प्रभू रामचंद्र आणि माता शबरी यांची ही कथा रामायणातील सर्वात भावूक प्रसंगांपैकी एक आहे. ही केवळ एका भेटीची गोष्ट नसून ती 'अद्वैत भक्ती' आणि 'निर्मळ प्रेमाचे' प्रतीक आहे.
 
प्रतिक्षा आणि प्रभूंचे आगमन
माता शबरी त्यांचे गुरू मतंग ऋषी यांच्या सांगण्यावरून अनेक वर्षांपासून प्रभू रामाची वाट पाहत होत्या. ऋषींनी जाताना सांगितले होते की, "शबरी, धीर सोडू नकोस, प्रभू राम तुला भेटायला तुझ्या आश्रमात नक्की येतील." तेव्हापासून शबरी रोज रामाच्या स्वागतासाठी रस्ता झाडून स्वच्छ करायची आणि फुलांनी सजवायची.
 
उष्टी बोरं आणि त्यामागचा भाव
जेव्हा सीतामाईच्या शोधात प्रभू राम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमात पोहोचले, तेव्हा शबरीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने प्रभूंच्या चरणांचे प्रक्षालन केले आणि त्यांना बसण्यासाठी आसन दिले.
 
बोरं चाखण्याचे कारण
शबरीला वाटले की, आपल्या रामाला आपण सर्वात गोड फळं द्यावीत. प्रभूला चुकूनही एखादे आंबट किंवा कडू बोर मिळू नये, म्हणून तिने प्रत्येक बोर आधी स्वतः चाखून पाहिले. जे बोर गोड लागायचे, तेच ती बाजूला काढून प्रभू रामाच्या पात्रात ठेवायची. अशा प्रकारे तिने प्रभू रामाला आपली 'उष्टी बोरं' अर्पण केली.
 
भक्तीचा स्वीकार
लक्ष्मणाला हे पाहून थोडे संकोच वाटला की, दादा उष्टी बोरं कशी खाणार? पण प्रभू राम शबरीच्या डोळ्यांतील भक्ती आणि प्रेम ओळखत होते. "शबरी, तुझ्या या बोरांमध्ये जी गोडी आहे, ती स्वर्गातील अमृतामध्येही नाही." असे म्हणत प्रभू रामाने अत्यंत आवडीने ती उष्टी बोरं खाल्ली. त्यांनी सिद्ध केले की, ईश्वराला अर्पण केलेल्या वस्तूपेक्षा ती कोणत्या भावाने अर्पण केली आहे, हे जास्त महत्त्वाचे असते.
 
प्रसंगाचे महत्त्व
प्रभू रामाने एका भिल्ल स्त्रीकडून उष्टे फळ खाऊन समाजाला समतेचा संदेश दिला.
 देवाला छपन्न भोग नको असतात, तर केवळ प्रेमाचा एक कण पुरेसा असतो. गुरूंवर असलेला विश्वास माणसाला ईश्वरापर्यंत कसे पोहोचवतो, याचे शबरी हे उत्तम उदाहरण आहे.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर वेबदुनियावर प्रकाशित/प्रसारित केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत आणि विविध स्त्रोतांकडून घेतले आहेत. वेबदुनिया या माहितीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. ही सामग्री सार्वजनिक हितासाठी सादर केली गेली आहे आणि कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांद्वारे समर्थित नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mohini Ekadashi: मोहिनी एकादशीच्या महत्त्वाच्या या 5 गोष्टी जाणून घ्या

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

आरती सोमवारची

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

पुढील लेख
Show comments