Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री भक्तविजय अध्याय ५
Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ऐका श्रोते सावधान ॥ कथा सुरस अतिपावन ॥ गोड पाहतां अमृताहून ॥ उपमा गौण वाटतसे ॥१॥
पवित्रपणें वर्णूं थोरली ॥ तरी गंगेहून दिसे आगळी ॥ विस्तीर्णपणें पाहतां भली ॥ उपमा निराळी नसेचि ॥२॥
गांभीर्यपणें पाहतां जाण ॥ सखोल दिसे समुद्राहून ॥ उदार कल्पतरूहून ॥ राव रंक सारिखे ॥३॥
शीतळपणें पाहतां युक्ती ॥ तरी उपमेसी गौण निशापती ॥ अमूल्य तरी रत्नज्योती ॥ त्याही झांकती निजतेजें ॥४॥
मान्यपणें पाहतां जाण ॥ तरी मुखें गातों पंचवदन ॥ दुर्लभ तरी इंद्रादिगण ॥ इजकारणें धुंडिती ॥५॥
ऐसी भक्तकथा पवित्र जाण ॥ सादर ऐका भाविक जन ॥ मागील अध्यायीं निरूपण ॥ केलें श्रवण सकळिकीं ॥६॥
भीमरथींत शिंपला वाहात ॥ तो गोणाईस लाधला नामा भक्त ॥ दुजा पडिला भागीरथींत ॥ वाहात जात अति वेगें ॥७॥
वाराणसीस गंगेतटीं ॥ लागला मणिकर्णिकेचे घांटीं ॥ जो शुकअवतार महाहटी ॥ नये पोटीं गर्भवासा ॥८॥
अयोनिसंभव होऊनि सगुण ॥ मुखें करित नामस्मरण ॥ शिंपल्यांतून ध्वनि निघे पूर्ण ॥ राम राम अहर्निशीं ॥९॥
तंव तमालमोमीन अकस्मात ॥ सूत धुवावयास आला तेथ ॥ निजदृष्टीनें खालीं पाहत ॥ तों शिंपला अवचित देखिला ॥१०॥
उदकांत जाऊनि ते क्षणीं ॥ शिंपला पाहे उकलोनी ॥ तों बाळक देखिलें नयनीं ॥ संतोष मनीं वाटला ॥११॥
केलें नसतां कांहीं साधन ॥ तों अवचित सांपडलें निधान ॥ धुंडितां थिल्लरजीवन ॥ तों क्षीरसागर देखिला ॥१२॥
कांचमणि ओंवितां तत्काळ ॥ अकस्मात देखिलें मुक्ताफळ ॥ शुक्तिका वेंचितां निर्मळ ॥ तों रत्न आंत सांपडलें ॥१३॥
पाहूं जातां यमनगरी ॥ तों दृष्टीं देखिली वैकुंठपुरी ॥ वस्तीत झोंपडी पाहत बरी ॥ तों हेममंदिरीं प्रवेशला ॥१४॥
पहावयास जाता डफगाण ॥ तों पुढें ऐकिलें हरिकीर्तन ॥ कीं ऐकावयासी गेला भांडण ॥ तों सामगायन होतसे ॥१५॥
शिंदीवरी करितां आदरू ॥ तों आंगणीं उगवला कल्पतरू ॥ संगतीस लागतां चोर जारू ॥ तों आले सद्गुरु भेटावया ॥१६॥
तेवीं प्रपंचव्यवहार करिता देख ॥ गंगेंत सांपडले निजबाळक ॥ जो कलियुगीं अवतरला श्रीशुक ॥ विश्वोद्धारक जगद्गुरु ॥१७॥
पालवीं घेऊनि निजप्रीतीं ॥ घरासी गेला सत्वरगती ॥ हर्षें ओसंडोनि चित्तीं ॥ कांतेप्रती सांगतसे ॥१८॥
म्हणे बत्तीसलक्षणी लावण्यभरित ॥ बाळक सांपडलें गंगेंत ॥ याचा प्रतिपाळ तूं निश्चित ॥ करीं त्वरित निजकांते ॥१९॥
ऐसें ऐकतां ते समयीं ॥ कांतेस पान्हा फुटला पाहीं ॥ स्तनपान करवूनि लवलाहीं ॥ हर्षें हृदयीं ओसंडे ॥२०॥
अविंधवंशीं वैष्णव थोर ॥ म्हणोनि नाम ठेविलें कबीर ॥ मायबापें तयावर ॥ प्रीति अपार करिताती ॥२१॥
बाळक करी नामस्मरण ॥ ऐकोनि आश्चर्य करिती जन ॥ म्हणती हा तमालमोमीन ॥ काय पुण्य आचरला ॥२२॥
वैष्णवभक्त तपागळा ॥ याचे उदरासी कैसा आला ॥ एक म्हणती अदृष्ट त्याला ॥ सानुकूळ जाहलें कीं ॥२३॥
अदृष्ट जाहलिया सानुकूळ ॥ कासया पाहिजे विद्याबळ ॥ नीचयोनींत जन्मले खळ ॥ त्यांसी वंदिती सकळ प्रारब्धें ॥२४॥
तेवीं याचें भाग्य अघटित ॥ पोटासी आला विष्णुभक्त ॥ क्षेत्रवासी लोक समस्त ॥ ऐसें बोलत परस्परें ॥२५॥
असो कांहीं होतें जन्मांतर ॥ म्हणोनि पोटासी आला कबीर ॥ दिवसेंदिवस जाहला थोर ॥ लग्न केलें तयाचें ॥२६॥
मातापिता कबीराप्रती ॥ प्रपंचव्यवहार शिकविती ॥ परी तें न ये त्याचें चित्तीं ॥ प्रपंचवृत्ती मानेना ॥२७॥
नाठवे आपुलें आणि पराव ॥ सम विषम नाहीं ठाव ॥ ब्रह्मादिक रंक राव ॥ सारिखा भाव तयांवरी ॥२८॥
पुढें पडिल्या द्रव्यराशी ॥ इच्छा न वाटे घ्यावयासी ॥ तस्कर नेतां निजद्रव्यासी ॥ रक्षण तयासी करीनाx ॥२९॥
यापरी कबीर करितां भजन ॥ प्रपंचासी येतसे उणें जाण ॥ दुराचारी हांसती पिशुन ॥ वर्तणूक देखोन कबीराची ॥३०॥
केळी बोरीसी एके ठायीं ॥ लावितां सौख्य न पडे कांहीं ॥ अग्नि जळ एकत्र पाहीं ॥ नांदतील कैसीं मित्रपणें ॥३१॥
वेश्या आणि पतिव्रता ॥ कृपण आणि उदार दाता ॥ निंदक आणि बुद्धिमंता ॥ वैर चाले परस्परें ॥३२॥
मक्षिका आणि पक्वान्न ॥ यांसी कैचें बरवेपण ॥ कीं अजापाळक आणि पंडितजन ॥ मित्रपणें न राहती ॥३३॥
राहू आणि निशापती ॥ कीं पतंग आणि दीपकज्योती ॥ कीं समुद्र आणि अगस्ती ॥ प्रीति कैशा रीती घडेल ॥३४॥
श्रीकृष्णचरित्र वाचितां जाणा ॥ न येचि शिशुपाळाचे मना ॥ श्रीरामप्रताप ऐकतां रावणा ॥ सौख्य न वाटे ज्या रीती ॥३५॥
विष आणि अमृतासी ॥ अखंड वैर चाले त्यांसी ॥ तेवीं प्रपंच आणि परमार्थासी ॥ विकल्प मानसीं सर्वदा ॥३६॥
असो आतां बहु भाषण ॥ कबीर करीतसे हरिभजन ॥ प्रपंचांत येतसे उणें जाण ॥ हांसती पिशुन तयासी ॥३७॥
हृदयीं धरिलासी श्रीपती ॥ तुझीं तों ऐसी विदेहस्थिती ॥ आतां प्रपंच कवणे रीती ॥ चालेल हें कळेना ॥३८॥
पांजणी करूनि तये दिवसीं ॥ मागीं बैसविलें कबीरासी ॥ परी देहबुद्धि नाठवे तयासी ॥ रामभजनीं विनटला ॥३९॥
ध्यानांत आणूनि श्रीराममूर्ति ॥ लाविलीं दोनी नेत्रपातीं ॥ नामरूपीं जडली वृत्ती ॥ देहाकृती नाठवे ॥४०॥
तों माता येऊनि तयाजवळी ॥ सावध करीत तये वेळीं ॥ म्हणे कबीरा तुज ये काळीं ॥ काय जाहलें कळेना ॥४१॥
माता मारील सत्वरी ॥ म्हणोनि आला देहावरी ॥ सावध होऊनि ते अवसरीं ॥ हातभरी विणियेला ॥४२॥
सवेंचि जाहली विदेहवृत्ती ॥ हृदयीं बिंबली श्रीराममूर्ती ॥ ऐसें देखोनि अयोध्यापती ॥ आपण बैसती विणावया ॥४३॥
म्हणे हा लागला माझे ध्यानीं ॥ माता मारील यालागुनी ॥ म्हणूनियां धनुष्यपाणी ॥ शेला विणीत बैसला ॥४४॥
जो क्षीरसागरविलासी ॥ ब्रह्मांडनायक वैकुंठवासी ॥ तो कबीराचिया मागासी ॥ विणावयासी बैसला ॥४५॥
योगी बैसले वज्रासनीं ॥ लवकरी xxये त्यांचे ध्यानीं ॥ तो कबीराची भक्ति देखोनी ॥ शेला विणीत बैसला ॥४६॥
श्रुति शास्त्रें करितां पठण ॥ प्राप्त नव्हेचि तीर्थाटन ॥ तो द्वारकावासी भक्तभूषण ॥ शेला विणीत बैसला ॥४७॥
सनकादिक मुणी जयासी ॥ ध्यानांत आणिती अहर्निशीं ॥ तो हरि कबीराचे मागासी ॥ शेला विणावया बैसला ॥४८॥
ज्याचे हृदयीं धरूनि चरण ॥ समुद्रतनया करी सेवन ॥ जो नीलग्रीवाचें प्रिय भूषण ॥ शेला विणीत बैसला ॥४९॥
तंव सावध होऊनि ते अवसरीं ॥ कबीर आला देहावरी ॥ विचार करूनि निजअंतरीं ॥ लागे लवकरी विणावया ॥५०॥
सावध होतांचि सत्वर ॥ ध्यानांत आला जानकीवर ॥ मागुती निवांत होऊन कबीर ॥ तो शारंगधर विणीतसे ॥५१॥
जेव्हां होय विदेहस्थिती ॥ तेव्हां विणीत रुक्मिणीपती ॥ कांहीं होतां देहस्फूर्ती ॥ दुरोनी पाहती कौतुक ॥५२॥
कबीर आणि शारंगधर ॥ दोघां जणीं विणिलें अंबर ॥ जेवीं गंगेसीं सरस्वतींचें नीर ॥ असे साचर अभेदत्वें ॥५३॥
तेवीं देव भक्त दोघे मिळोनी ॥ वस्त्र विणिलें तेच क्षणीं ॥ घडी करून निजसदनीं ॥ मातेपासीं दिधलीं ॥५४॥
माता म्हणे कबीरासी ॥ आतां जाईं बाजारासी ॥ शेला विकून वेगेंसीं ॥ द्रव्य घेऊनि येईं कां ॥५५॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ कबीर निघाला सत्वरीं ॥ शेला घेऊनि निजकरीं ॥ जाऊनि बाजारीं बैसला ॥५६॥
लावूनियां नेत्रपातीं ॥ हृदयीं चिंती श्रीराममूर्ती ॥ मुखें गातसे रामकीर्ती ॥ विदेहस्थिति होउनी ॥५७॥
शेला आणिला विकावयासी ॥ हा आठव नाहीं निजमानसीं ॥ हृदयीं धरूनि हृषीकेशी ॥ जपे राम मानसीं निजप्रेमें ॥५८॥
व्यवहारी आले बाजारी ॥ कबीर बैसला त्यांशेजारीं ॥ परी शेल्यासी सत्वरीं ॥ गिर्हाईक कोणी न येचि ॥५९॥
जो देवाधिदेव वैकुंठनाथ ॥ शेल्यासी लागले त्याचे हात ॥ घेणारासी अमूल्य दिसत ॥ दृष्टीं पाहतां दुरोनी ॥६०॥
पांचांत वस्त्र घेणारासी ॥ द्विगुणमोलाचें दिसे त्यासी ॥ दहांत घेऊं म्हणतां मानसीं ॥ दिसे तयासी विसांचें ॥६१॥
पंचविसांत जे घेणार ॥ तयांसी दिसे पन्नासांवर ॥ शत अर्धाचें पाहणार ॥ दुप्पट मोलाचें त्यां दिसे ॥६२॥
पांचशत सहस्राचे जोहरी ॥ तयांसी दिसे सहस्त्रावरी ॥ अमूल्य म्हणोनी ते अवसरीं ॥ उगेचि दुरून पाहती ॥६३॥
म्हणती पुसावें यासी जरी ॥ तरी द्रव्य नाहीं आपुले पदरीं ॥ कोणी सावकार येती जोहरी ॥ त्यांसी दिसे लक्षावरी मोलाचें ॥६४॥
एकाकडे एक पाहत ॥ पुढें जाती बाजारांत ॥ म्हणती हा कबीर भक्त ॥ अमूल्य वस्त्रें विणितो कीं ॥६५॥
द्रव्य नसतां आमुचे पदरीं ॥ उगेच आलों हाटबाजारीं ॥ ऐसें बोलोनि नरनारी ॥ जाती सत्वरी लगबगें ॥६६॥
ज्याची जैशी शक्ति जाण ॥ तैसेंच दिसे त्याकारण ॥ कबीरपाशीं गिर्हाईक कोण ॥ न पुसे येऊन म्हणोनियां ॥६७॥
जो वस्त्र जैसें घेऊं म्हणे ॥ तैसेंचि दिसे त्याकारणें ॥ जैसें जीवमात्रीं चैतन्य ॥ वसे जैसें तैसियापरी ॥६८॥
मोहरी कांदा ऊंस जाण ॥ बीज पेरूनि घातलें जीवन ॥ ज्याचे जैसे होते गुण ॥ उदक तैसेंचि जाहलें कीं ॥६९॥
कीं अनेक वाद्यें वाजती घोषें ॥ तयासारिखेंच होय आकाश ॥ कबीराचें वस्त्र तैसें ॥ भिन्नत्वें दिसे सकळांसी ॥७०॥
नातरी एकचि सुवर्ण ॥ अलंकारीं दिसें भिन्नपण ॥ कीं जितुकें जो घालीं इंधन ॥ दिसे कृशान तेवढाचि ॥७१॥
कीं नापित दावीत आरसा ॥ पाहणार पाहती जैसा ॥ कबीराचा शेला तैसा ॥ घेणारासी दिसतसे ॥७२॥
दुरूनि दृष्टीं पाहूनियां ॥ म्हणती शक्ति नसे घ्यावया ॥ जवळी द्रव्य नसतां वायां ॥ व्यर्थ कासया पुसावें ॥७३॥
ऐसें जन बोलोनि त्वरित ॥ उगेचि जाती बाजारांत ॥ श्रीरामभजन कबीर भक्त ॥ प्रेमयुक्त करीतसे ॥७४॥
अस्तमानासी जातां दिनकर ॥ ओसरत चालिला बाजार ॥ नेतेर उघडोनि कबीर ॥ भोंवतें साचार विलोकी ॥७५॥
म्हणे घरा गेले सकळ लोक ॥ शेल्यासी नाहीं ग्राहिक ॥ आतां आश्रमासी जातां देख ॥ माता मारील मजलागीं ॥७६॥
ऐसें म्हणूनि विष्णुभक्त ॥ उगाचि बैसला निवांत ॥ तों एक ओस घर अकस्मात ॥ नयनीं त्वरित देखिलें ॥७७॥
कबीर उठोनि सत्वरगती ॥ जाऊनि बैसला एकांतीं ॥ श्रीरामभजन ॥ निजप्रीतीं ॥ सप्रेमगती करीतसे ॥७८॥
सासू गांजील म्हणून ॥ लपोनि बैसे जैसी सून ॥ तेवीं मातेचे भयेंकरून ॥ बैसलासे एकांतीं ॥७९॥
कीं ध्रुवासी मायेनें हाणिली लात ॥ रुसोनि गेला अरण्यांत ॥ तेवीं उदास होऊनि कबीर भक्त ॥ ओस घरांत बैसला ॥८०॥
कीं त्यजूनि सकळ कर्मास ॥ संन्यासी होती परमहंस ॥ तेवीं संसारीं होऊनि उदास ॥ ओस घरांत बैसला ॥८१॥
ऐशापरी तो विष्णुदास ॥ प्रवेशलासे घर ओस ॥ निष्ठा देखोनि जगन्निवास ॥ सत्त्व पाहावयास पातला ॥८२॥
अति वृद्ध होऊनि ब्राह्मण ॥ वस्त्र नेसला फाटकें जीर्ण ॥ हिंव सुटलें अति दारुण ॥ पौष माघांसारिखें ॥८३॥
कबीराचें पाहावया उदारपण ॥ म्हणोनि कांपतसे जगज्जीवन ॥ करीत बैसला होता भजन ॥ तों पातला ब्राह्मण तया ठायीं ॥८४॥
हरिश्चंद्ररायापासीं त्वरित ॥ छळावया पातला गाधिसुत ॥ कीं श्रियाळापासीं कैलासनाथ ॥ होऊनि अतीत पातला ॥८५॥
अंबरीषाचें सत्त्व ऐकोनी ॥ छळावयासी पातले दुर्वासमुनी ॥ कीं बळीचें सत्त्व पाहावया नयनीं ॥ वामन होऊन देव आले ॥८६॥
तया रीतीं तोचि ब्राह्मण ॥ कबीरासी बोले दीनवदन ॥ म्हातारा मी अनाथ दीन ॥ वस्त्राविण पीडलों कीं ॥८७॥
तूं विष्णुभक्त अतिउदार ॥ शीतकाळ पडिला थोर ॥ कांहीं वस्त्र असेल तर ॥ द्यावें सत्वर मजलागीं ॥८८॥
ऐसें म्हणतां वैकुंठवासी ॥ कबीर विचारी निजमानसीं ॥ नाहीं म्हणतां ब्राह्मणासी ॥ हानी सत्त्वासी होईल ॥८९॥
मग अर्ध शेला फाडोनि सत्वर ॥ ब्राह्मणासी देत कबीर ॥ सप्रेम भजन निर्धार ॥ करिता झाला तेधवां ॥९०॥
वस्त्र पांघरूनि चक्रपाणी ॥ बाहेर आले तये क्षणीं ॥ विचार करिती निजमनीं ॥ मागुती जाऊनि पाहावें ॥९१॥
ऐसें बोलोनि शारंगधर ॥ मलंगवेषें झाला फकीर ॥ माथां शोभती जटाभार ॥ चरणीं तोडर गारमणी ॥९२॥
हातीं तसबी घेऊनि माळ ॥ डोळे आरक्त केले विशाळ ॥ सत्त्व पहावया घननीळ ॥ चाले तत्काळ अतिवेगें ॥९३॥
सुवर्ण मलिन देखतां दृष्टी ॥ पाहावया घेती कसवटी ॥ कीं भ्रमित नाणें असेल पोटीं ॥ सुलाख टोंचिती निजबळें ॥९४॥
किंवा अमूल्य हिरा देखोन ॥ त्यावरी परीक्षक मारिती घण ॥ तेवीं कबीराचें पाहावया मन ॥ फकीर होऊन देव आले ॥९५॥
अट्टहास करूनि देख ॥ उभा ठाकूनि मारिली हांक ॥ कबीरासी म्हणे वस्त्र एक ॥ द्यावें त्वरित आम्हांसी ॥९६॥
खुदा निराकार निर्गुण ॥ तुज नाहीं त्याची आठवण ॥ तयासी सांडोनि रामभजन ॥ किमर्थ येथें करितोसी ॥९७॥
ऐसी ऐकोनियां वाणी ॥ कबीर बोले मंजुळवचनीं ॥ म्हणे निराकार सगुण दोनी ॥ अभिन्नपणें असती कीं ॥९८॥
तूप थिजलें कीं विघुरलें ॥ परी घृतपणा नाहीं मुकलें ॥ कीं अलंकार करितां सुवर्ण भलें ॥ नाहीं मुकलें निजतेजा ॥९९॥
तेवीं अव्यक्त जें कां अविनाश ॥ तेंच आलें आकारास ॥ भक्तकार्यासी जगन्निवासें ॥ सगुण वेष धरियेला ॥१००॥
ऐसें बोलतां वैष्णववीर ॥ मागुती काय बोले फकीर ॥ कांहीं वस्त्र असेल जर ॥ द्यावें सत्वर मजलागीं ॥१॥
अर्धशेला होता उरला ॥ तो वेगें काढूनि त्यास दिधला ॥ उपधिरहित होऊनि बैसला ॥ फकीर गेला झडकरी ॥२॥
सरोनि गेलिया वर्षाकाळ ॥ आकाश जैसें दिसे निर्मळ ॥ कीं डांक गाळितांच तत्काळ ॥ दिसे सोज्ज्वळ कांचन ॥३॥
मैलागिरी भुजंगें सोडिला ॥ कीं चंद्रमा राहूनें उगळिला ॥ तेवीं उपाधिरहित भला ॥ कबेर बैसला भजनासी ॥४॥
कीं गंगेचा ओहटलिया पूर ॥ दिसे जैसें निर्मळ नीर ॥ कीं समुद्रांतून काढिला मंदराचळ ॥ राहिली खळखळ तयासी ॥५॥
तेवीं ग्राहक न ये शेल्यासी ॥ म्हणोनि चिंता होती मानसीं ॥ ते निरसली म्हणोन उल्हासीं ॥ कबीर मानसीं संतोषला ॥६॥
यापरी करूनि समाधान ॥ करीत बैसला श्रीरामभजन ॥ ऐसें ऐकूनि जगज्जीवन ॥ काय करित तें ऐका ॥७॥
ब्राह्मणवेष हृषीकेशी ॥ गेला कबीराचे घरासी ॥ बोलावून त्याचे मातेसी ॥ वृत्तांत तियेसी सांगत ॥८॥
म्हणे कबीर बैसला बाजारासी ॥ गिर्हाइकें पुसती शेल्यासी ॥ परी तो उत्तर नेदीच त्यांसी ॥ मौन वाचेसी धरियेलें ॥९॥
उदंड आले घेणार ॥ परी त्यांसी नेदी प्रत्युत्तर ॥ ध्यानांत आणून सीतावर ॥ भजन साचार करीतसे ॥११०॥
बाजार अवधा ओसरला ॥ मग एक ब्राह्मण बोलाविला ॥ अर्धशेला फाडूनि त्याला ॥ त्याणें दिधला जननीये ॥११॥
शेष राहिलें जें अंबर ॥ मग बोलाविला एक फकीर ॥ अर्धशेला सत्वर ॥ दिधला साचार तयासी ॥१२॥
ओस घरीं पाहून एकांत ॥ भजन करीत बैसला तेथे ॥ दुरून देखिला म्यां वृत्तांत ॥ आलों त्वरित सांगावया ॥१३॥
माझे मनींचा भाव पूर्ण ॥ कीं तुमचें असावें कल्याण ॥ परी कबीर संसारांत मन ॥ न घालीच जननीये ॥१४॥
ऐसें बोलतां वैकुंठवासी ॥ ऐकोन क्रोध आला मातेसी ॥ म्हणे आतां येईल मंदिरासी ॥ ताडीन तयासी निजकरें ॥१५॥
ऐकूनि बोले मनमोहन ॥ तो गृहीं लवकर न येचि जाण ॥ वृश्चिक अन्याय करितां पूर्ण ॥ बैसे लपून आन ठायीं ॥१६॥
तो बैसलासे एकांतीं ॥ चल दाखवितों तुजप्रती ॥ वृद्धेसी धरूनियां हातीं ॥ चाले श्रीपति लवलाहें ॥१७॥
सत्वर आलीं दोघें जण ॥ जेथें कबिर बैसला करीत स्मरण ॥ वृद्धेसी दाखवी दुरून ॥ जगज्जीवन तेधवां ॥१८॥
बैसला होता जिये सदनीं ॥ तेथें रामनामाची निघे ध्वनी ॥ जैसा नारदें अनुष्ठानीं ॥ वाल्मीकि मुनी बैसविला ॥१९॥
कीं अशोकवनीं बैसली सीता ॥ सप्रेम भजे रघुनाथा ॥ कीं जटायु रावणें गांजितां ॥ रामभजन करीतसे ॥१२०॥
कबीर बैसला तैशा रीती ॥ ध्यानांत आणूनि श्रीराममूर्ती ॥ मुखें गातसे रामकीर्ती ॥ विदेहस्थिती होऊनि ॥२१॥
सांडोनियां मानापमान ॥ सांडोनि लौकिक अभिमान ॥ सांडोनि इंद्रियाचें विषयध्यान ॥ करी कीर्तन निजमुखीं ॥२२॥
तों माता आली सदनांत ॥ दुरूनि दाखवी वैकुंठनाथ ॥ आपण बाहेरी राहूनि त्वरित ॥ पाहे कौतुक भक्ताचें ॥२३॥
माता म्हणे कबीराला ॥ शेला आणूनि दावीं मजला ॥ नाहीं तरी ये वेळां ॥ शिक्षा करीन तुजलागीं ॥२४॥
तंव तो नेदीच प्रत्युत्तर ॥ रामभजनीं मन जाहलें स्थिर ॥ माता आणि द्विजवर ॥ आलीं हें साचार कळेना ॥२५॥
नामरूपीं जडलें चित्त ॥ म्हणूनि जाहला देहातीत ॥ माता होऊनि क्रोधयुक्त ॥ काय बोलत निजपुत्रा ॥२६॥
अरे तूं मैंदपणें येथ ॥ भजन करिसी प्रेमयुक्त ॥ हें ऐकूनि वैकुंठनाथ ॥ वृद्धेस्सी बोलत तेधवां ॥२७॥
तूं अपशब्द बोलसी ओठीं ॥परी माया येतसे तुझे पोटीं ॥ आतां हातीं घेऊनि शिंपटी ॥ शिक्षा करीं पुत्रासी ॥२८॥
ऐकोनि कबीराची माया ॥ म्हणे कांहीं न दिसे मारावया ॥ देवें शिंपटी काढोनियां ॥ तिचे हाती दीधली ॥२९॥
सक्रोध होऊनि ते अवसरीं ॥ मारी कबीराचे पाठीवरी ॥ तंव तो नाहीं देहावरी ॥ रामभजनीं विनटला ॥१३०॥
कौतुक वर्तलें ते अवसर्रीं ॥ तें परिसावें भक्तचतुरीं ॥ मारितां कबीराचे पाठीवरी ॥ बाहेर श्रीहरी कांपत ॥३१॥
म्हणे तूं मारितेसी निजबाळ ॥ ते माझे पाठीवरी आले वळ ॥ आतां पुरे वो तत्काळ ॥ ऐसें घननीळ बोलिला ॥३२॥
जैसी मुळीं लागतां कुठारधारा ॥ वृक्ष कांपतसे थरथरां ॥ तेवीं शिक्षा करितां भक्त कबीरा ॥ जगदुद्धारा जाहलें कीं ॥३३॥
कीं दुर्जनें गांजितां बाळकासी ॥ तें दुःख झळंबे निजमायेसी ॥ तेवीं शिक्षा करितां भक्त कबीरा ॥ जगदुद्धारा कांपत ॥३४॥
नातरी सैन्य आटतां सकळ ॥ राजा होतसे व्याकुळ ॥ तेवीं गांजितां भक्त प्रेमळ ॥ दीनदयाळ कांपत ॥३५॥
कीं पाडस पडिलिया फांसीं ॥ ते व्यथा वाटे हरिणीसी ॥ तेवीं गांजितां निजभक्तासी ॥ हृषीकेशी घाबरले ॥३६॥
कीं समुद्र देखोनि अगस्तीसी ॥ भयें कांपे निजमानसीं ॥ तेवीं मातेनें मारितां कबीरासी ॥ वैकुंठवासी घाबरले ॥३७॥
मग म्हणे रुक्मिणीकांत ॥ आतां पुरे करीं वो मात ॥ ऐसें म्हणोनि अनंत ॥ काय बोलत तेधवां ॥३८॥
म्हणे मी छळावयासी गेलों बळीतें ॥ तंव द्वारपाळचि जाहलों तेथें ॥ तेवीं माझें कपट मजभोंवतें ॥ आलें निरुतें फळासी ॥३९॥
उदंड भाविक भक्त थोर ॥ परी कोणी दिधला नाहीं मार ॥ मजहूनि वरिष्ठ भक्त कबीर ॥ कळलें साचार ये काळीं ॥१४०॥
मग म्हणे सीतारमण ॥ यासी रूप दावावें सगुण ॥ ब्राह्मणवेषें केलें छळण ॥ याजकारणें कळेना ॥४१॥
विप्रवेश तत्काळ टाकून ॥ हातीं घेतले धनुष्यबाण ॥ मुकुट विराजे देदीप्यमान ॥ आकर्णनयन ॥ विराजती ॥४२॥
कर्णीं कुंडलें अति सोज्ज्वळ ॥ हृदय विशाळ माज चिवळ ॥ कंठीं कौस्तुभ अतिनिर्मळ ॥ शोभे माळ वैजयंती ॥४३॥
कांसे कसिला पीतांबर ॥ चरणीं नृपुरें वांकी तोडर ॥ सीतेसहित जानकीवर ॥ प्रगट जाहले तेधवां ॥४४॥
कबीर नेत्र पाहे उघडोनी ॥ तों कोटी उगवले वासरमणी ॥ ऐसें रूप देखतां नयनीं ॥ मिठी चरणीं घातली ॥४५॥
मग म्हणे वैकुंठवासी ॥ तूं उतरलासी माझिये कसीं ॥ आतां मी न विसंबें तुजसी ॥ जेवीं बाळकासी निजमाय ॥४६॥
सुलाखणीं टोंचून नाणें ॥ गांठीसी बांधिती सज्ञान ॥ कीं अमूल्य हिर्यासी मारूनि घण ॥ भांडारगृहीं ठेविती ॥४७॥
तेवीं तुज लाविला कसवटी ॥ आतां ठेवीन हृदयसंपुटीं ॥ सदा पाहेन कृपादृष्टीं ॥ ऐसें जगजेठी बोलिला ॥४८॥
कबीराचे मातेस जगज्जीवन ॥ सप्रेम देत आलिंगन ॥ म्हणे तुझें भाग्य मजकारण ॥ न वर्णवेचि सर्वथा ॥४९॥
ऐसें म्हणतां हृषीकेशी ॥ हर्ष वाटला निजमायेसी ॥ कबीरा धरून पोटासी ॥ क्षेम तयासी दिधलें ॥१५०॥
म्हणे बा तुझ्या पुत्रपणें ॥ मज जाहलें श्रीरामदर्शन ॥ मातेनें कबीर हातीं धरून ॥ गेली घेऊन निजगृहीं ॥५१॥
मग म्हणे श्रीसीतारमण ॥ माझें हृदयीं करीं चिंतन ॥ ऐसें म्हणोनि जगज्जीवन ॥ अदृश्य जाहले तेधवां ॥५२॥
अहो संतचरित्रग्रंथ साचार ॥ हेंचि मानससरोवर ॥ सभाग्य श्रोते भक्त चतुर ॥ येती सत्वर या ठाया ॥५३॥
मुक्ताफळचारा पाहिजे ज्यांस ॥ ते बैसती तेथें राजहंस ॥ अभक्त द्वेषी निंदिती वायस ॥ नाहीं विश्वास ज्यां चित्तीं ॥५४॥
ते तर खडेच खाती प्रीतीं ॥ ज्यांसी मुक्ताफळें न रुचती ॥ तेवीं अभक्तां नुपजे भक्ती ॥ विकल्प धरिती मनांत ॥५५॥
परी तें असो आतां सज्जनीं ॥ अवधान द्यावें मजलागुनी ॥ जेवीं बाळक बोले बोबड्या वचनीं ॥ ऐकोनि जननी संतोषे ॥५६॥
डोळसांचा माग ऐकून कानीं ॥ आंधळे चालती चांचपोनी ॥ तेवीं मी बोलें आर्षवाणी ॥ कृपेंकरूनि तूमच्या ॥५७॥
तुम्हीच उजळोनि माझी मती ॥ ग्रंथ वदवीतसां सप्रेमयुक्ती ॥ आरंभ्हीं नांव महीपती ॥ लिहिलें ग्रंथीं निजकृपें ॥५८॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ परिसोत भाविक भक्त ॥ पंचमाध्याय गोड हा ॥१५९॥
॥ अध्याय ॥ ॥५॥ ॥ ओंव्या ॥१५९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री भक्तविजय अध्याय ४
श्री भक्तविजय अध्याय ३
श्री भक्त विजय अध्याय २
श्री भक्तविजय अध्याय १
सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर
सर्व पहा
नवीन
आरती गुरुवारची
दशावतारस्तोत्रम्
गुरुवारी भगवान विष्णूच्या या मंत्रांचा जप करा, जीवनातील अडथळे दूर होतील
Saubhagya Panchami 2024 : आज मनापासून शिव - शंभूची पूजा करा, सर्व इच्छा पूर्ण होतील.
Chhath Pooja 2024 : छठ पूजा म्हणजे काय? चार दिवसांच्या सणाबद्दल संपूर्ण माहिती
सर्व पहा
नक्की वाचा
Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत
तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?
हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात
हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा
ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा
पुढील लेख
श्री भक्तविजय अध्याय ४
Show comments