Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री परशुराम माहत्म्य अध्याय १४
Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ जनार्दनाय नमः ॥
जय जया अनंत महात्म्या जय जया परमात्म्या जय जया श्रीहरे नमिलें म्या तुज चरणकमळीं ॥१॥
तुझे चरण पूजिती सुंदर ॥ नित्य नियमानें जे नर तया पुरुषार्थ इहपर पावती प्रसादें ॥२॥
भार्गव सांगती गंगा नंदना उपासना योग मुख्य जाणा स्वशाखोक्त विधी ब्राह्मणा सांगीतला असे ॥३॥
प्रतिमा अग्नी ब्राह्मण सूर्य किंवा त्हृदय सदन शालग्राम शिला उत्तमोत्तम पूजास्थानें हीं असती ॥४॥
आदौ विधियुक्त करावें स्नान अस्पृष्ट शुत्ध वस्त्र परिधान मग तिलकादी करुन नित्य कर्म करावें ॥५॥
टिलक मुद्रा वांचूनि कर्म ब्राह्मणाचें व्यर्थ जाण सर्वदा ईश भक्तानी ह्मणून हा विधी करावा ॥६॥
गोपीचंदनाचे तिलका दंडाकृती ललाट फलका अन्यत्र दीप कलिका पद्माकृती उदरस्थळीं ॥७॥
दक्षिण स्तनीं श्रीवत्स वामभागीं श्री रेखेस हे रात्रंदिवस विधिविशेष देव पित्रकर्माविषयीं ॥८॥
ऐक शिष्या तिलक विधी ललाटे गले त्हृदी कुक्षी द्वये कर्ममूले मूर्ध्नी पृष्ठे बाहौनाभिवर्ती ॥९॥
एवं नामें द्वादश तिलक मूलमंत्रें लाविजे भक्तिपूर्वक वरतीं लिहावें कृष्ण शस्त्रोक ॥ स्पष्ट आणि सुरचित्त ॥१०॥
मुद्रा लावण्याची मिती कोणच्या स्थानीं कोणती जेणें अत्यंत ईश प्राप्ती ते ऐका शिषोत्तमा ॥११॥
सव्यक पोले चक्र लाविरे तैसींच पंचउदरें ॥ त्हृदयीं ती न शिष्यारे आणि स्तनींही ॥१२॥
पार्श्वे कर्णमूले भुजे इतुके दक्षिणे चक्रद्वय लाविजे कंठे वामबाहू ते एकेक जाणिजे आतां शंख स्थानें सांगतों ॥१३॥
पार्श्वेक पोले ही एकेक आणि दक्षिण बाहू असावा शंख स्तनें कर्णमूले दोन दोन देख वाम बाहौती न जाणा ॥१४॥
आतां ऐका कौमोदककी सव्य बाहौ ललाट फलकीं येथें लाविजे एक एकी वाम स्तने पार्श्वे दोन दोन ॥१५॥
पद्म लावावें कैसें वक्ष तिलकीं दक्षिण पार्श्वे उजवे स्तनीं लावणें असे तैसे बाहो दोन जाण ॥१६॥
नाम मुद्रा सर्वांवरतीं लावितां नाशती अर्ति निःपाप होऊनि मनोरथ पुरती आणि वैकुंठीं पाविजे ॥१७॥
ब्राह्मणांनीं मंत्रें करुन त्द्यामुद्रा विधीनें धारण करितां तोचि जनार्दन होईजे ॥१८॥
जपाला घ्यावी पद्माक्ष माला तुलसी आंवळी धारणाला आणि रत्नमाळा सकळाला उत्तमा जाणिजे ॥१९॥
मग पूजा मंडपीं जाऊन आसन कुश कृष्णाजिन वरतीं चैल जाण घालोनि बैसावें स्थीर तेथें ॥२०॥
आसन विधी भूतशुद्धी करावे मग न्यासादि नंतर करा ध्यान समाधी त्हृदयस्थाची ॥२१॥
त्हृदयीं श्रीपती रुपध्यान तेथें अक्रावें मानस पूजन मग तो बात्द्य आवाहूनमिलितोपचारें पूजावा ॥२२॥
आदौ द्वार देवतेंचें प्रार्थन दीपाचें करुनि प्रज्वालन मनुष्य दुर्गंध नाशार्थ मंत्र ह्मणून देव प्रार्थावे ॥२३॥
सर्व देव आगमनार्थ राक्षसादिकां भयार्थ प्रार्थूनि घंटा यथार्थ घंटानाद करावा ॥२४॥
घंटाग्रीं असावा गरुड ती देवासी अतिअवड प्रीत्यर्थ देवाच्यापुढे ठेवूनि वाजवावी ॥२५॥
वामभागीं कलशस्थित नारायण पूजावा निश्चित कलशस्य ह्मणत हस्तवरी ठेउनी ॥२६॥
मंत्र ह्मणोनी कलशः कीर्ती आणीक जे आर्थिती तयां दुःखपापादि न स्पर्शती कदाकाळीं ॥२७॥
शंखाची करुनि प्रार्थना शुत्धोदकें करा प्रोक्षणा गंध तुलसी सुमना युक्त पूजावा ॥२८॥
सकलोपचार प्रोक्षून करावें निर्माल्य विसर्जन मग पीठ मंडप पूजोन देव ध्यावा ॥२९॥
करुनि उत्थापन प्रार्थन पाद्य अर्घ्य आचमन पंचामृतादिकांचें स्नान उक्त मंत्रांनीं ॥३०॥
वस्त्रोप वस्त्र देऊन अष्टंगधाचें सुचर्चन मग पुष्प पूजा करावी जाण सहस्त्रनाम श्लोकांनीं ॥३१॥
पुष्पें सुगंध शुभ्रपीत शामादिही प्रीय अत्यंत बहु प्रकारचीं पद्यें विष्णुप्रत वाहावीं अवश्य ॥३२॥
कृष्ण रक्त पुष्पें पर्युषिता आणीक असती निर्गंधता अपराध दोष तीं वाहतां निश्चयें ॥३३॥
पुष्पांमध्यें पद्म माझी विभूती ह्मणूनी मज तयाची प्रीती कमल सहस्त्रानें पूजिती मनोरथ पुरती तयांचे ॥३४॥
दुर्वेनें पूजितां विष्णूसी वाढे तयाचे वंशासी सुखी तो जन्मो जन्मासी शिष्योत्तमा ॥३५॥
माझ्या पूजेसी मुख्य तुळसी तीनें वरिलें श्रीशासी ह्मणूनि ती नित्य चरणासी वाहावी माझिया भक्तानें ॥३६॥
पत्र किंवा दल मंजुरी कोमल वाहतो दयाल प्रसन्नतो ॥३७॥
वाहा केशवा दिनमानी धूपदीप अर्पूनी नैवेद्य विस्तारें करोनी अर्पावा ॥३८॥
हस्तमुख प्रक्षाळन सुगंधानें करो द्वर्तन कालोद्भव फळें अर्पून तांबूल द्यावें ॥३९॥
सुवर्ण पुष्प देऊनि दक्षणा कर्पूरयुक्त निरांजना वोवाळुनि अनेकजाणा शंखभ्रमण करावें ॥४०॥
त्या तीर्थाचें करावें मार्जन तात्काळ होय पापक्षालन आणीक बाधा व्याधी नाशन होती सर्व ॥४१॥
मंत्र पुष्पांजुळी वाहूनि जाणा रुपाचें करावें अवलोकना स्थिर मनानें प्रदक्षिणा घाला मग ॥४२॥
जैसी नवमासाची गर्भिणी स्थीर चाले अधोवदनी तैसी प्रदक्षिणा करोनी अष्टांग नमावें ॥४३॥
अनंत ते वेद पुराण ते संवाद वर्णिती गोविंद एक माझा ॥४४॥
मी दीन अपराधी जन्ममृत्यूची व्याधी नाश करी हो आधीं नारायणा ॥४५॥
नारायण हरे तारी तारी देवारे शरण तुझ्या पायीं रे आलों ईशा ॥४६॥
ऐसें नमोनि प्रार्थून छत्रादि आदर्श दाखवून करावें मग पूर्ण ध्यान आणि तत् प्रधान व्हावें ॥४७॥
सन्मूख पूजावे पार्षदगण देवाचे उच्छिष्ट प्रसादें करुन रमाब्रह्मा मुख्य प्राण शुक सनकादिक ॥४८॥
शंख पृष्टी रमा ब्रह्मा मारुतीची असावी प्रतिमा घंटाग्रीं गरुड जाणा पूजनासी ॥४९॥
रुद्रेंद्रादिकांच्या मंत्रमूर्ती पूजाव्यात अतिप्रीती गुरु पूजावे यथाशक्ती अती भक्तीनें ॥५०॥
महाविष्णु प्रसादानी घेवोत सकळ महाजनी ऐसें वदोनि त्हृदय सुमनीं देव प्रार्थोनि आणावेत् ॥५१॥
मूल मंत्रादिकांचे हवन अवश्य नित्य करोन सर्वत्र असावें विष्णु स्मरण हरीसी सर्वस्व अर्पावें ॥५२॥
गंधाक्षता प्रसाद ॥ लावोनि पढावे वेद मग भक्षूनि नैवेद्य नृत्य गायन करावें ॥५३॥
मद्भक्तांनी मद्य मांस पलांडुल शुनकलिंजास वर्ज करावीं ही विशेष पंचमहापातकेंहीं असतीं ॥५४॥
अपवित्र दीर्घ भोपळा न भक्षावें मसुरांला भक्षितां पावेल दोषाला मंदमती होईल ॥५५॥
ब्राह्मणांचा ब्रह्म विचार हाचि त्यांचा सदाचार तेणें वोळखावा लक्ष्मीवर ह्मणजे कृत कृत्य होईजे ॥५६॥
जी असे ईश विस्मृती तीच होय मुख्य विपत्ती स्मृती हेचि संपत्ती सत्य सांगतों ॥५७॥
माझें मुख्य होय स्मरण कृष्ण राम नारायण चतुर्विध अर्थ येणें करुन पूर्ण होती ॥५८॥
स्वधर्माचरण हरीचें स्मरण ध्यान योग पूर्ण पाहिजे तो ॥५९॥
ऐकोनि विनवी भीष्मराणा धन्य धन्य झालों जाणा सेविलें तुमचे चरणा तव मुखामृत प्राशविलें ॥६०॥
परी नसेचि तृप्तता ह्मणोनि विचारितों तत्वतां पद्म माझी विभूती ह्मणतां तिचें महात्म्य सांगावें ॥६१॥
आपण भक्त कैवारी नारायण लोकांसी भासतां मनुष्यपण निर्लिप्त आहात परब्रह्मपूर्ण आह्मासी कल्पतरु ॥६२॥
पद्म आपुली विभूती ऐसें कवी ही ह्मणती तें कारण मजप्रती विस्तारावें दातारा ॥६३॥
विचारितां ऐसें राम सांगती तें विस्तारोन पद्म महात्म्य अपार जाण वेदांमाजीं ॥६४॥
आदि मी उदर ब्रह्म तेथोनि जाहलें पद्म तें लक्ष्मीनें केलें सद्य आणि ब्रह्मा निर्मिला ॥६५॥
ब्रह्मा बैसोनि पद्यां माजीं कोणीं मज निर्मिलें आजी ऐसें बोलोनि काळजीं अधो नयनीं बैसला ॥६६॥
तंव दिसलें पद्म नाल तें अति गंभीर खोल तेथें उतरोनी पाहे सकळ अपूर्व वस्तू अनंत ॥६७॥
तेथें देखिलें पद्मबीज नीलरत्ना परी सतेज तें घेवोनि वर्तिं अज येवोनि बैसला पूर्ववत ॥६८॥
ह्मणे काय सांपडिलें आपणा तयासि अक्ष संज्ञा वदे जाणा चिंता करी जगत्कारणा काय कर्तव्य वदतसे ॥६९॥
तंव तप आकाशवाणी जाली अकस्मात नारायणी ध्यानें विचार करी ऐकूनी ती वेदवाणी ॥७०॥
हेंचि आपणा उपनयन ह्मणती वैजयंतीमाला जाण केली त्या अक्षाची गुंफून ब्रह्मसूत्रीं ॥७१॥
कंठीं घालूनिती माला स्वयमेव पावले द्विजत्वाला मग करिती तपाला स्वयंभूपणें ॥७२॥
तप करितां सहस्त्र वरुष प्रसन्न जाहला त्हृषीकेश गरुडासनीं दिव्य वपुषें दर्शन दिधलें ब्रह्मयासीं ॥७३॥
श्रीवत्स कौत्सुभावीण आत्मतुल्य पार्षदजाण सवें करिती सेवन ऐसें दिसलें ब्रह्मयासी ॥७४॥
अनंत सूर्या सुप्रभा धरिलें श्रीवत्स कौत्सुभा अष्टभुजे पद्मनाभ ध्यान दिसे ईश्वराचें ॥७५॥
वामांकीं शोभेल लक्ष्मीजाण खालीं सोडिला एक चरण वज्रांकुश ध्वज पद्मादिकें सुलक्षण कमलापरी मृदु शोभती ॥७६॥
ज्या पद्यांभूजा जाहली तीच विष्णूनें योनी कल्पिली गंगाती चरणकमळीं अखिल पवित्र कराया ॥७७॥
देखोनि साष्टांग प्रणाम घालूनि ह्मणे धन्य आपण षोडशोपचारें पूजोन अंजुळी जोडोनि स्तवितों ॥७८॥
देव देवा पुराण पुरुषा त्रयहीना त्र्यधीशा त्रिशक्तिधारा त्हृषीकेशा देव एका नमोस्तुते ॥७९॥
श्रीसत्यज्ञान अनंता तूं निरती शयानंदा निगम वेद्या गोविंदा सर्वातीता नमोस्तुते ॥८०॥
तुह्मीं जाणतो पंचभेद अखंड जो वर्णिती वेद न जाणती जीव त्रिविध चिद्घन व्यापका नमोस्तुते ॥८१॥
मुक्त सर्वदा ध्याती लक्ष्मी अखंड वंदिती भक्तांवरि तुमची प्रीती ह्मणोनि मज प्रसन्नले कीं ॥८२॥
ऐसें स्तवितां चक्रपाणी वरदहस्तें करोनी तप श्रम हरले स्पर्शोनी मेघ वाणी बोलती ॥८३॥
माझिया पूर्व वाणी करुन तव तप जाहलें पूर्ण तूं पद्मबीज केलें धारण ह्मणोनी प्रसन्नलों ॥८४॥
त्यासी वदलासी अक्ष संज्ञा तीच माझी होय आज्ञा ॥ हे ब्रह्मसूत्रीं गुंफिती वेदज्ञा होतील ते ॥८५॥
ब्रह्मसूत्र पद्माक्ष माळा कमंडलू धरिती द्विजत्वाला तेचि पावतील पूर्ण तेला तपादिकें करुनी ॥८६॥
संतुष्ट जाहलों मी तव तपा पूर्ण संपादिली कृपा उत्पन्न करोनि आतां लोकपा सृष्टी करावी मत्प्रीत्यर्थ ॥८७॥
स्थापन करीगा धर्म जेणें माझें संतुष्टी पूर्ण तैसें करावें तुवां जाण माझ्या प्रेरणे ॥८८॥
इतुकें सांगूनि अंतर्धान पुढें ब्रह्मा सृष्टी रचन सात्द्य घेऊनि मुख्य प्राण सरस्वती ते उत्पादिली ॥८९॥
वीणा पुसतक धारिणी आणि असे पद्माक्ष मालिनी तटस्थ ब्रह्मयश वर्णनीं कुमारीती निरंतर ॥९०॥
मग ऋषीनें धरिले पद्माक्ष त्यांसी जाहले ईश प्रत्यक्ष पूर्वीं आराधना करी सहस्त्राक्ष पद्मबीजीं राहुनी ॥९१॥
इंद्र जाणे पद्म महिमा पूर्वीं वृत्र नामें असुरजाणा तो मारितां हत्या भीषणा लागली इंद्रातें ॥९२॥
तो कमलाच्या आश्रयानें सहस्त्र वर्षें स्थीरमनें तप केलें शुद्धी कारणें मग मुक्त जाहला ॥९३॥
सर्व रत्नाचें जें पुण्य तें कोटि गुणित पद्माक्षी पूर्ण चतुर्विध पुरुषार्थ जाण ॥ ही वंदितां ॥९४॥
जगतासी कारण पद्माक्ष त्याणें पद्मनाभ मंत्रलक्ष जपातीं तयां अपरोक्ष होइजे सत्य ॥९५॥
भार्गव ह्मणे भीष्मासी अक्ष महीमा आहे ऐसी मुख्य हे देव ब्राह्मणासी वाखाणिती वेदशास्त्रें ॥९६॥
ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतेश्वरासी समस्त घालिजे अतिहर्षी पद्माक्षमाला ॥९७॥
मुक्तिकामी जे घालिती त्यांसी नाहीं पुनरावृत्ती जे मनीं संकल्पिती ते लाभती चारी पुरुषार्थ ॥९८॥
ब्राह्मणांदि चतुर्वर्णांसी गोह त्या दिपापांसी वीर हत्या आत्महत्येसी धारितां पवित्र करी ॥९९॥
पंच महापातकांसी अगम्यगमन भ्रूण हत्येसी मुक्त करी महासंकटासी अक्षमाला धरितां ॥१००॥
ब्रह्मविद्या ब्राह्मणांसी दिग्विजय क्षत्रियांसी धनप्राप्ती वैश्यांसी ॥ सौभाग्य स्त्रिया पावतील ॥१॥
जाणोनि अथवा अज्ञानतां पापें घडलीं असंख्यातां ॥ तीं जाती पद्माक्श स्पर्शतां परशुराम ह्मणे ॥२॥
जप तप सत्कर्म पीतृदेवाचें जाण अक्षमाळे वांचून व्यर्थ होती ॥३॥
अक्षाचें महिमान सहस्त्रवदन अद्यापी वर्णन करितो कीं ॥४॥
विष्णू लक्ष्मी सरस्वती कमळ धरुनि हातीं निर्दुःख करिती साधूंप्रती सर्वकाळ ॥५॥
पद्माक्ष धारण पद्मानी पूजन करितां नारायण संतुष्टतो ॥६॥
संवाद परशुराम भीष्माचा सूत ऋषीसी सांगती साचा तो मी वर्णिला वेंचा ऐकतां लाभती पुरुषार्थ ॥७॥
अगाध असे पद्मपुराण सुखें परिसोत श्रोतेजन अनंत महात्म्य वर्णितां जाण अनंत पदवी पाविजे ॥८॥
स्वस्तीश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकातां निःपाप होती नरु चतुर्दशोध्याय गोड हा ॥१४॥ श्रीकार्तवीर्यांतकार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री परशुराम माहत्म्य अध्याय १३
श्री परशुराम माहत्म्य अध्याय १२
श्री परशुराम माहत्म्य अध्याय ११
श्री परशुराम माहत्म्य अध्याय १०
श्री परशुराम माहत्म्य अध्याय ९
सर्व पहा
नवीन
Thursday remedy गुरुवारी या प्रकारे करा दत्तात्रेयाची पूजा, परीक्षेत यश मिळेल
आरती बुधवारची
बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य
सर्व पहा
नक्की वाचा
मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?
अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या
योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल
पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ
आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस
पुढील लेख
श्री परशुराम माहत्म्य अध्याय १३