स्नान संध्या नित्य नैमित्तिक यज्ञ हा द्विज जातीचा कर्म मार्ग मुख्य आणि पूजन श्रवणादिक अन्य भक्तिमार्ग जाणा ऐसा ॥७६॥
नित्य नैमित्तिक कर्म जें जें करावें आपण तेथें जाणोनि नारायण आणि तें त्यासीच अर्पिजे ॥७७॥
आणि ईशप्रीतीचे धर्म जे जे वदे पंचारात्रागम ती भक्तीमार्ग जाण मोक्ष प्राप्तीला ॥७८॥अधोक्षज भक्ती वांचून सर्व आहे व्यर्थजाण जन्म मरणा कारण श्रोते जनहो ॥७९॥