अध्याय अडतीसावा - श्लोक १ ते ५० श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ हातीं घेऊनि चार शर ॥ उभा मंगलभगिनीचा कुमर ॥ तंव मागूनि चतुरंग दळभार ॥ अति गर्जरें पातलें ॥१॥ सवें सकळ पृथ्वीचे नृपवर ॥ मध्यें शत्रुघ्न प्रचंड वीर ॥ तों तेणें ऐकिली मात सुंदर ॥ घोडा धरिला म्हणोनि...