Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बलरामाच्या नांगराची माहीत नसलेली कथा

Webdunia
बुधवार, 20 मे 2020 (07:31 IST)
श्रीकृष्णाचे थोरले भाऊ बलरामाला बलदाऊ, दाऊ, संकर्षण आणि हलधर असे ही म्हणतात. हलधर या साठी की ते आपल्या बरोबर नेहमीच नांगर ठेवायचे. बलरामाचे मुख्य शस्त्र नांगर आणि मुसळ आहे. नांगराने शेतकरी शेती करतात. नांगर हे शेती प्रधान भारताचे प्रतीक आहे. 
 
भाद्रपदाच्या कृष्णपक्षातील षष्ठीला बलराम जयंती साजरी केली जाते. ते शेषनागाचे अवतार असे. या दिवशी आई आपल्या लेकरासाठी त्याचा दीर्घायुष्याची इच्छा घेऊन नांगरषष्ठीचे (ह्ळषष्ठी) चे उपवास करते. देशाच्या पूर्वीकडे उत्तर प्रदेश, बिहार मध्ये ह्याला लाली छठ आणि मध्य भारतात हरछठ असे ही म्हटले जाते. 
 
असे म्हणतात की श्रीकृष्ण गो पालक आणि बलराम हे शेतकरी. म्हणूनच बलराम हे शेतकर्‍यांचे आराध्य आहेत. बलराम हे खूप शक्तिशाली होते. एक सामान्य माणूस नांगर उचलून त्याचा शस्त्र सारखा वापर करू शकत नाही पण बलराम त्या नांगराचा वापर शस्त्राच्या रूपाने करत होते. 
 
बलरामाच्या नांगराच्या वापरण्यावर एक आख्यायिका मध्ये दोन गोष्टी सापडतात. 
असे म्हणतात की एकदा कौरव आणि पांडवांमध्ये एक प्रकाराचा खेळ झाला असताना बलराम त्यात जिंकले होते पण कौरव ते स्वीकारायला तयारच नव्हते. अशावेळी बलरामाने रागाच्या भरात आपल्या नांगराने हस्तिनापूरच्या संपूर्ण जमिनीला ओढून गंगेत बुडविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच क्षणी आकाशवाणीने बलराम जिंकल्याचे सांगितले होते. त्यावर सर्वांनी विश्वास केल्यावर समाधानी होऊन बलरामाने आपले नांगर खाली ठेवले होते. तेव्हा पासून ते हलधर म्हणून प्रसिद्ध झाले.
 
एक दुसरी गोष्ट अशी की श्रीकृष्णाच्या बायको जांबवंतीच्या मुलाचे मन दुर्योधन आणि भानुमतीची मुलगी लक्ष्मणावर मोहित होते. ते दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. दुर्योधनाच्या मुलाचे नाव लक्ष्मण आणि मुलीचे नाव लक्ष्मणा होते. दुर्योधनाला आपल्या मुलीचे लग्न श्रीकृष्णाच्या मुलासोबत करावयाचे नव्हते. म्हणून एके दिवशी  सांब हा लक्ष्मणाशी गंधर्व विवाह करतो आणि लक्ष्मणाला आपल्या रथामधून द्वारिका घेऊन जाऊ लागतो. कौरवांना ही गोष्ट कळतातच कौरव आपल्या पूर्ण सैन्यासकट सांबाशी युद्ध करावयास येतात. 
 
कौरव सांबाला बंदिवान करतात. श्रीकृष्ण आणि बलरामाला हे कळतातच बलराम हस्तिनापूर जाऊन कौरवांना सांबला सोडून लक्ष्मणासह पाठवून देण्याची विनवणी करतात परंतु कौरव बलरामाचे काहीही ऐकून घेत नाही. 
 
अशा परिस्थितीत बलराम फार संतापतात. आपले रागीट रूप घेऊन आपल्या नांगराने हस्तिनापुराला संपूर्ण जमिनीसह गंगेत विसर्जित करावयास निघतात. कौरव हे बघून घाबरून जातात. सर्व हस्तिनापुरात त्राही त्राही होते. सर्व बलरामाची माफी मागतात आणि सांब सह लक्ष्मणाची पाठवणी करतात. नंतर सांब आणि लक्ष्मणाचा वैदिक विधीने लग्नाचा सोहळा पार पडतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

संत निर्मळाबाई माहिती

श्री गजानन कवच

यशाची उंची गाठायची असेल तर नीम करोली बाबांच्या या 3 गोष्टी लक्षात ठेवा

खाटू श्याम चालीसा Khatu Shyam Chalisa Lyrics

गजानन महाराज आवाहन

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments