Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुखी विवाहित जीवनासाठी द्रौपदीचा सल्ला

Webdunia
महाभारतात महिलांमध्ये कुंतीनंतर सर्वात समजूतदार आणि अनुभवी होती ती म्हणजे द्रौपदी. द्रौपदीचं व्यक्तित्व आणि चरित्र महाभारत आणि इतर ग्रंथांमध्ये उत्तम मानले गेले आहे. अनेक प्रसंगी द्रौपदीने पांडवांना महत्त्वपूर्ण सल्ला देऊन त्यांची मदत केली. द्रौपदीला अनुभवी समजून अनेक महिला त्यांच्याकडून शिकत होत्या. असाच एक प्रसंग तेव्हा घडला जेव्हा प्रभू श्रीकृष्ण यांच्या पत्नी सत्यभामा यांनी द्रौपदीकडून सुखी विवाहित जीवनाचं रहस्य विचारलं. the secrets of a happy married life, as told by Draupadi to Satyabhama.
 
एके दिवशी पांडव आणि संत आश्रमात बसलेले होते. त्यावेळी द्रौपदी आणि सत्यभामा यादेखील सोबत बसल्या होत्या आणि आपसात बोलत होत्या.
 
सत्यभामाने द्रौपदीला विचारले- बहीण, तुझे पती पांडवजन तुझ्यावर नेहमी प्रसन्न असतात. मी बघते की ते नेहमी तुझ्या नियंत्रणात असतात, तुझ्यापासून समाधानी असतात. मला ही असेच काही सांग ज्याने श्यामसुंदर देखील माझ्यावर खूश राहतील.
 
तेव्हा द्रौपदी म्हणाली- सत्यभामा, असे कसे दुराचारिणी स्त्रियांबद्दल विचारत आहे. पतीला कळले तर तो कधीच वश मध्ये येणार नाही. तेव्हा सत्यभामाने म्हटले- तर सांग, की तू पांडवांसोबत कसा व्यवहार करते?
 
 
उचित प्रश्न ऐकून द्रौपदी म्हणाली-
1. ऐक, मी अहंकार आणि काम, क्रोध सोडून सावधगिरीने सर्व पांडवांची स्त्रियांसकट सेवा करते.
2. मी ईर्ष्यापासून दूर राहते. मनावर ताबा ठेवून कडू भाषणांपासून दूर राहते.
3. कोणाच्याही समक्ष असभ्यपणे उभी राहत नाही.
4. वाईट भाषण करत नाही आणि वाईट स्थानी बसत नाही.
5. पतीच्या अभिप्रायाला पूर्ण संकेत समजून अनुसरण करते.
6. देवता, मनुष्य, सज-धज किंवा रूपवान पुरुष का नसो, माझे मन पांडवांव्यतिरिक्त कुठेच जात नाही.
7. त्यांचे स्नान झाल्याशिवाय मी स्नान करत नाही. ते बसल्याशिवाय मी बसत नाही.
8. माझे पती घर आल्यावर मी घर स्वच्छ ठेवते. त्यांना वेळेवर भोजन देते.
9. सदैव सावध राहते. घरात गुप्त रूपात धान्य ठेवते.
10. मी दराबाहेर जाऊन उभी राहत नाही.
11. पतीशिवाय एकटे राहणे मला पसंत नाही.
12. यासोबत सासूने सांगितलेले धर्म पालन करते आणि सदैव धर्माच्या आश्रयात राहते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

टिटवाळा येथील महागणपती

आरती बुधवारची

इंदुकोटी तेजकिरण स्तोत्र

Akhuratha Sankashti Chaturthi 2024: अखुरथ संकष्टी चतुर्थी या दिवशी या मंत्राचा जप करा, जीवनातील सर्व संकटे दूर करा

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments