Festival Posters

Valga suktam in marathi नजरदोष, शत्रूपीडा आणि दारिद्रय यापासून मुक्ती मिळेल, वल्गा-सूक्त पठण करा

Webdunia
सोमवार, 17 फेब्रुवारी 2025 (12:56 IST)
वल्गा-सूक्त या देवी स्तोत्राची माहिती
वल्गा-सूक्तची देवता बगला मुखी देवी आहे. आपल्या समस्या दूर करण्यासाठी  या प्रकारे उपासना करावी. कोणत्याही अमावसेला रात्री बारा वाजता हि उपासना सुरु करावी. रात्री स्नान करून पूजेची सुरवात करावी. एक चौरंग घेऊन त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवावे आपल्याला बसायला सुद्धा लाल किंवा पिवळे आसन घ्यावे. पूर्वाभिमुक किंवा उत्तराभिमुख बसावे. चौरंगावर देवीचा फोटो अथवा मूर्ती ठेवावी. फोटो / मूर्तीला स्नान घालावे हळद कुंकू गंध वहावे. गुलाब अत्तर लावावे. धूप दीप ओवाळावा. खिरीचा नैवेद्य दाखवावा. आपल्या सर्व समस्या देवीला सांगून समस्या निवारण्याची प्रार्थना करावी. वल्गा-सूक्त चे 108 पाठ करावे व दररोज 11 पाठ करावे या उपायाने साधारण महिना भरात समस्या संपायला सुरवात होते.
 
साधना काळात मद्यपान, नॉनव्हेज खाणे टाळावे. हे नियम पाळणे शक्य आहे त्यानेच ही साधना करावी.
 
 
अथर्व-वेदोक्त वल्गा-सूक्त
यां ते चक्रुरामे पात्रे, यां चक्रुर्मिक्ष-धान्यके। 
आमे मांसे कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।१ 
यां ते चक्रुः वृक-वाका, वजे वा यां कुरीरिणि। 
अव्यां ते कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।२ 
यां ते चक्रुरेक-शफे, पशूनामुभयादति।
 गर्दभे कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।३ 
यां ते चक्रुरमूलायां, वलगं वा नराच्याम्।
 क्षेत्रे ते कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।४ 
यां ते चक्रुर्गार्हपत्ये, पूर्वाग्नावुत दुश्चितः। 
शालायां कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।५ 
यां ते चक्रुः सभायां, यां चक्रुरधिदेवते। 
अक्षेषु कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।६ 
यां ते चक्रुः, सेनायां, यां चक्रुरिष्वायुधे। 
दुन्दुभौ कृत्यां यां चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।७ 
यां ते कृत्यां कूपे वदधुः, श्मशाने वा निचख्नुः। 
सद्मनि कृत्यां या चक्रुः, पुनः प्रति-हरामि ताम्।।८
 यां ते चक्रुः पुरुषस्यास्थे, अग्नौ संकसुके च याम्। 
म्रोकं निर्दाहं क्रव्यादं, पुनः प्रति-हरामि ताम्।।९
 अपर्थनाज-भारैणा, तां पथेतः प्रहिण्मसि।
 अधीरो मर्या धीरेभ्यः, संजभाराचित्या।।१० 
यश्चकार न शशाक, कर्तु शश्रे पादमङ्गुरिम्। 
चकार भद्रमस्मभ्यमभगो भगचद्भ्यः।।११ 
कृत्यां कृतं वलगिनं, मूलिनं शपथेऽप्ययम्।
 इन्द्रस्तं हन्तुमहता, बधेनाग्निर्विध्यत्वस्तया।।१२ 
ALSO READ: श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्री गजानन महाराज गुरुवार व्रत

Guruvar Vrat गुरुवारच्या उपवासात काय खावे

२३ वर्षांनंतर मकर संक्रांतीला एक दुर्मिळ योगायोग: भूत जमात वाघावर स्वार; जूनपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल

मकर संक्रातीला झटपट घरी बनवा तिळाच्या मऊ वड्या TilGul Vadi Recipe

Budhwar Upay बुधवारी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments