rashifal-2026

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 4 मार्च 2025 (21:22 IST)
घरात लग्न किंवा मुंज असली की कार्याच्या एक दिवस आधी देव देवक केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा लग्नाच्या दिवशी हा विधी कार्यालयात केला जातो. वर आणि वधू पक्षाचे देव देवक वेग वेगळे बसवले जाते. 

देव देवक म्हणजे देवाकडून लग्न समारंभात केले जाणारे संरक्षण. देवाचे ऋण फेडण्यासाठी, देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, देवाचे आवाहन करण्यासाठी हा  विधी केला जातो.  देव देवक बसवताना वधू आणि तिचे आई वडील पूर्वीकडे तोंड करून बसतात. त्याच प्रमाणे वर आणि त्याचे आई वडील देखील देव देवक बसवताना पूर्वीकडे तोंड करून बसतात. 
ALSO READ: घाणा भरणे आणि हळद समारंभ
देव देवक बसवताना एका सुपात दुहेरी धाग्याचे सूत गुंडाळून नारळ ठेवले जाते. कुलदेवीचे किंवा कुलदेवाचे स्मरण करून कलश स्थापना करतात. 27 सुपार्यांवर मातृका देवता व आंब्यांची पाने ठेवतात. देवाला आवाहन केले जाते. शुभ कार्य निर्विघ्न व्हावे या साठी देवाला आळवतात. 

एका समिधेला आंब्याची पाने उलटी बांधली जातात. 27 देवतांची स्थापना गहू व तांदूळ पसरून करतात. हे सूप देवापुढे ठेवतात. सूपमध्ये कलश म्हणून सुघड ठेवतात. मातीचे सुघड ठेवण्यामागचे कारण म्हणजे आपले जीवन हे मातीच्या घडासारखे असते. ते व्यवस्थितपणे हाताळले तरच जीवनाचा आनंद भोगता येतो. मातीच्या घड्याला धक्का लागल्यावर तो भंगतो. हे याचे द्योतक आहे. 
ALSO READ: मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा
देव देवक बसल्यावर देवकोत्थापन करे पर्यंत त्या कार्याशी संबंधितांना सोयर, सुतक इत्यादी नियम लागू होत नाही. आणि कार्यात कोणतीही बाधा येत नाही. 

देव देवक बसल्यावर वराच्या घरातील थोरले आणि नातेवाईक वर आणि आई वडिलांना आहेर देतात तसेच वधू पक्षाकडे पण नातेवाईक आहेर देतात हा आहेर घरचा आहेर असतो. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: मुहूर्त वडे कसे घालायचे पद्धत जाणून घ्या

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

Vasant Panchami 2026 वसंत पंचमीचा उत्सव कधी साजरा केला जाईल?

दशरथकृत शनी स्तोत्राने समस्या होतील दूर, मिळेल शनिदोषापासून मुक्ती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments