Festival Posters

यमराजाचे हे 7 मंदिर, कधी गेले आहात का आपण?

Webdunia
हिंदू धर्मात तीन दंड नायक आहे यमराज, शनिदेव आणि भैरव. यमराजाला 'मार्कण्डेय पुराण'नुसार दक्षिण दिशेचे दिक्पाल आणि मृत्यूचा देवता म्हणतात. यमराजाचे पुराणात विचित्र विवरण मिळत. पुराणानुसार यमराजाचा रंग हिरवा आहे आणि त्यांनी लाल रंगांचे वस्त्र धारण केले आहे. यमराज म्हैसची स्वारी करतात आणि त्यांच्या हातात गदा असते. स्कन्दपुराणात कार्तिक कृष्णा त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केले जाते.   
 
यमराजाचे मुंशी 'चित्रगुप्त' आहे ज्यांच्या माध्यमाने ते सर्व प्राणांचे कर्म आणि चांगला वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात. चित्रगुप्ताची बही 'अग्रसन्धानी'मध्ये प्रत्येक जीवाच्या चांगला वाईट कर्मांचा हिशोब असतो. स्मृतीनुसार 14 यम मानले गेले आहे - यम, धर्मराज, मृत्यू, अन्तक, वैवस्वत, काल, सर्वभूतक्षय, औदुंबर, दध्न, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त. आम्ही जाणून घेऊ यमराजच्या खास मंदिरांबद्दल....  

भरमौरचे यम मंदिर  (Yamraj temple Chamba Himachal) : यमराजाचे हे मंदिर हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भरमौर नावाने स्थित आहे जे एक भवनाप्रमाणे आहे. असे म्हणतात की विधाता लिहितो, चित्रगुप्त वाचतो, यमदूत पकडून आणतात आणि यमराज दंड देतात. मान्यता अशी आहे की येथेच व्यक्तीच्या कर्मांचा हिशोब होतो. यमराजाचे नाव धर्मराज म्हणून पडले कारण धर्मानुसार त्यांना जीवांना दंड देण्याचे कार्य मिळाले होते.
हे मंदिर एका घरासारखे दिसते जेथे एक रिकामी खोली आहे ज्यात यमराज आपले मुंशी चित्रगुप्तासोबत विराजमान आहे. या कक्षाला चित्रगुप्त कक्ष म्हटले जाते. चित्रगुप्त यमराजाचे सचिव आहे जे जीवात्माच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतात.  
 
मान्यतेनुसार जेव्हा कुठल्या प्राणीचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्याला पकडून सर्वात आधी या मंदिरात चित्रगुप्तासमोर प्रस्तुत करतात. चित्रगुप्त जीवात्म्याला त्यांच्या कर्माचे पूर्ण वृत्तांत ऐकवतात. त्यानंतर चित्रगुप्तच्या समोरच्या खोलीत आत्म्याला घेऊन जातात. या खोलीला यमराजाची कचेरी म्हणतात. येथे यमराज कर्मानुसार आत्म्याला आपला निर्णय ऐकवते.  
 
असे मानले जाते की या मंदिरात चार अदृश्य द्वार आहे जे स्वर्ण, रजत, तांबा आणि लोखंडाने बनलेले आहे. यमराजाचे निर्णया आल्यानंतर  यमदूत आत्म्याला कर्मानुसार त्याच मार्गाने स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. गरूड पुराणात पण यमराजच्या दरबारातील चार दिशांचे चार दारांचा उल्लेख करण्यात आला आहे.  
 
पुढील पानावर यमदेवाचे दुसरे मंदिर ...

यमुना-धर्मराज मंदिर विश्राम घाट, मथुरा (Yamuna Dharamraj temple Mathura): हे मंदिर उत्तर प्रदेशातील मथुरेत यमुनेच्या काठावर विश्राम घाटाजवळ स्थित आहे. याला भाऊ बहिणीचे मंदिर देखील म्हणतात कारण यमुना आणि यमराज सूर्याचे पुत्री आणि पुत्र होते. या मंदिरात यमुना आणि धर्मराजच्या मुरत्या एकत्र लागलेल्या आहेत.  


अशी पौराणिक मान्यता आहे की जो भाऊ, भाऊभिजेच्या दिवशी यमुनेत स्नान करून या मंदिराचे दर्शन करतो त्याला यमलोक जाण्यापासून मुक्ती मिळते. याची पुराणात एक कथापण आहे, जी बहीण भाऊबीज अर्थात यम द्वितीयेच्या दिवशी ऐकते.
 
पुढील पानावर यमदेवाचे तिसरे मंदिर....
धर्मराज मंदिर, लक्ष्मण झुला हृषीकेश (Dharamraj temple, Rishikesh):- उत्तर प्रदेशातील हृषीकेशामध्ये स्थित यमराजाचे हे मंदिर फारच जुने आहे. येथे गर्भगृहात यमराजाची स्थापित मूर्ती लिहिण्याच्या मुद्रेत विराजित आहे आणि याच्या जवळपास इतर मुरत्या यमदूताच्या मुरत्या मानल्या जातात. पण यमराजच्या डावीकडे एक मूर्ती स्थापित आहे, जी चित्रगुप्ताची मूर्ती आहे.
 
पुढील पानावर यमदेवाचे चवथे मंदिर...

श्रीऐमा धर्मराज मंदिर (Sri Ema Dharmaraja temple):- हे मंदिर तमिळनाडुच्या तंजावूर जिल्ह्यात स्थित आहे. या मंदिराबद्दल मान्यता अशी आहे की हे हजारो वर्ष जुने मंदिर आहे.  
 
पुढील पानावर पहा यमदेवाचे पाचवे मंदिर ...

वाराणसीचे धर्मराज मंदिर : काशीत यमराजाशी निगडित पूर्वी कधीही न ऐकलेली माहिती आहे. मीर घाटावर उपस्थित आहे अनादिकालचे धर्मेश्वर महादेव मंदिर जेथे धर्मराज यमराजाने महादेवाची आराधना केली होती. मान्यता अशी आहे की यमाला यमराजाची उपाधी येथेच मिळाली होती. धर्मराज युधिष्ठिराने अज्ञात वासादरम्यान येथे धर्मेश्वर महादेवाची पूजा केली होती. मंदिराचा इतिहास पृथ्वीवर गंगा अवतरणाच्या आधीचा आहे, जो 
काशी खंडात वर्णित आहे.

पुढील पानावर पहा यमदेवाचे सहावे म‍ंदिर ...

थिरुप्पाईन्जीली यम धर्मराज स्वामी मंदिर (Thiruppainjeeli, Manachanallur,Trichy, TamilNadu) : हे मंदिर तमिळनाडुच्या  थिरुप्पाईन्जीली मनछानाल्लूर, त्रिचीत स्थित आहे.

पुढील पानावर पहा सातवे मंदिर  ...

श्रीचित्रगुप्त आणि यमराज मंदिर कोयम्बटूर (Shri Chitragupt and Yamraj temple in Coimbatore) : यमराजाचे हे मंदिर तमिळनाडुच्या कोयम्बटूरच्या वेल्लालूर मेन रोडवर सिंगानल्लुरमध्ये स्थित आहे. येथे एक फारच सुंदर झील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

Maghi Ganesh Jayanti 2026 Wishes in Marathi माघी गणेश जयंती 2026 शुभेच्छा मराठीत

Guruvar Niyam लक्ष्मी देवीची पूजा करणार्‍यांनी गुरुवारी हे करणे टाळावे

Ganesh Jayanti 2026: गणेश जयंती २०२६ मुहूर्त, पूजा विधी आणि हा नैवेद्य खास

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती कधी? का साजरी केली जाते आणि धार्मिक महत्त्व काय?

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments