Ganga Saptami 2024 : सनातन धर्मात, गंगा सप्तमीचा दिवस सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार गंगा सप्तमीला गंगा जयंती असेही म्हणतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला गंगा सप्तमी साजरी केली जाते. हा सण उत्तर भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. याशिवाय गंगा मातेची पूजाही विधीपूर्वक केली जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत गंगा सप्तमी कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे.
2024 गंगा सप्तमी कधी आहे?
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी 14 मे 2024 रोजी मंगळवारी गंगा सप्तमी साजरी केली जाईल. शुभ मुहूर्त सकाळी 11:26 ते दुपारी 2:19 पर्यंत असेल. पंचांगानुसार, गंगा सप्तमीची शुभ तिथी 13 मे रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मे संध्याकाळी 6:49 वाजता समाप्त होईल.
गंगा सप्तमीचे महत्त्व
धार्मिक मान्यतांनुसार गंगा नदीला सर्वात पवित्र नदी मानली जाते. गंगा सप्तमीच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. यासोबतच आत्माही शुद्ध होतो. शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठीही गंगेचे पाणी वापरले जाते. जे लोक गंगा स्नान करतात त्यांना नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते.