रंग खेळतांना प्रत्येकाला आनंद येतो. पण त्वचेचा रंग काढणे कठीण होते. त्वचेचा रंग निघण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. तसेच अनेक लोक आपल्या त्वचेला खूप रगडतात कि ज्यामुळे त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
नारळाचे तेल- त्वचेला लागलेला रंग काढण्यासाठी नारळाचे तेल खूप फायदेशीर असते. त्वचेवर नारळाचे तेल लावावे. मग हलक्या हातांनी त्वचेला मसाज करा. जसे जसे तेल त्वचेमध्ये मुरेल तसतसे त्वचेला लागलेले रंगाचे डाग देखील कमी होतील. नारळाच्या तेलच्या उपयोगाने तुमच्या त्वचेची जळजळ देखील होणार नाही.
दही- जर त्वचेला जास्त दीर्घ रंग लागला असेल तर एक वाटीमध्ये दही घ्या व त्यामध्ये थोडी हळद मिक्स करा. मग या मिश्रणला त्वचेवर हलक्या हातांनी लावा. या पेस्टला कमीतकमी 20 मिनिटांपर्यंत लावा. मग कोमट पाण्याने त्वचेला धुवावे. यामुळे त्वचेला लागलेले रंग निघायला मदत होईल.
बेसन- बेसनमध्ये थोडे दही मिक्स करून याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टला त्वचेवर लावा. त्वचेला हलक्या हातांनी स्क्रब करा. काही वेळ असेच राहु दया. नंतर पाण्याने धुवून टाकावे यामुळे त्वचेचा रंग निघण्यास मदत होईल.
एलोवेरा जेल- प्रत्येकाच्या घरात एलोवेरा जेल हे असते. एलोवेरा जेल हे पूर्ण त्वचेवर लावा. तुम्ही एलोवेरा जेलचा उपयोग केसांनमध्ये देखील करू शकतात. यामुळे त्वचेला लागलेला रंग निघण्यास मदत होईल.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.