Festival Posters

एमा स्टोन बनली जगात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:25 IST)
जगातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा चित्रपट ‘ला ला लॅंड’ची प्रमुख अभिनेत्री एमा स्टोन बनली असून फोर्ब्स मॅगझिनने एमा स्टोन सर्वाधिक कमाई करणारी महिला असल्याचे घोषीत केले आहे. गेल्या वर्षभरात जवळपास 166.4 कोटी रूपये या 28 वर्षांच्या अभिनेत्रीने कमावले आहेत.
 
तिला ऑस्करकडून ‘ला ला लॅंड’ या चित्रपटात केलेल्या तगड्या अभिनयाचे बक्षीस म्हणून बेस्ट एक्‍ट्रेस या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. पुरूष आणि स्त्री कलाकारांना समान मानधन मिळावे यासाठी यावर्षी तिने लिंग समानतेसाठीही आवाज उठवला होता. जगभरात ‘ला ला लॅंड’ चित्रपटाने जवळपास 445 मिलियन डॉलरची कमाई केली आहे.
 
अभिनेत्री जेनिफर एनिस्टन हिचा या यादीत दुस-या क्रमांकावर असून गेल्या वर्षात जेनिफर एनिस्टनने 2.55 कोटी डॉलरची कमाई केली आहे. प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही सिरीज फ्रेन्ड्‌समध्ये झळकणारी अभिनेत्री म्हणून जेनिफर एनिस्टनची ओळख आहे. ड्रामा फिल्म ‘द येलो बर्ड’ यामध्येही जेनिफर दिसली होती. याशिवाय ती अमिरात एअरलाइन्सची ब्रॅन्ड ऍम्बेसेडर देखील आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्स तिस-या क्रमांकावर आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

रझिया सुलतान' फेम ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम एम बेग यांचे निधन, घरी मृतावस्थेत आढळले

पाण्याखालील सुंदर जग एक्सप्लोर करायचे आहे का? भारतातील ही ठिकाणे स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवनेरी किल्ल्यावर रितेश विलासराव देशमुख यांची विशेष भेट

रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज!

कृति सेनन आजच्या पिढीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक का आहे ते जाणून घ्या?

पुढील लेख