Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्कर पुरस्कार कोण देतं? विजेते कसे निवडले जातात?

Webdunia
सोमवार, 11 मार्च 2024 (11:00 IST)
2024 च्या ऑस्कर सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. जगभरातील सिने-चाहत्यांच्या या सोहळ्याकडे लक्ष असते. यावर्षी बार्बी, ओपनहायमर, किलर ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटांची चांगलीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
 
दर काही महिन्यांमध्ये आपण एखादा चांगला सिनेमा पाहतो, त्याला प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळते, बॉक्स ऑफिसवर तो बक्कळ कमाई करतो. पण ऑस्करला भलताच कुठला तरी सिनेमा जातो. असं का होतं?
 
जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते?
 
समजून घेऊ या ऑस्कर पुरस्कारांची प्रक्रिया.

ऑस्कर पुरस्कार कोण देतं?
हॉलिवुड – अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधल्या एका टेकडीवर लावलेली ही अक्षरं आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी पाहिली आहेत. इथूनच काही मैल अंतरावर असलेल्या डॉल्बी थिएटरमध्ये दरवर्षी जगभरातल्या लाखो लोकांना यायचं असतं... वार्षिक अकादमी पुरस्कारांसाठी, ज्यांना ‘द ऑस्कर्स’सुद्धा म्हटलं जातं.
 
1927मध्ये अमेरिकेच्या सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या काही कालाकारांनी Academy of Motion Picture Arts and Sciences ही संस्था सुरू केली. आणि 1928 साली पहिल्यांदा त्यांनी त्यांचे अकादमी पुरस्कार दिले. आज अमेरिकेतलेच नव्हे तर जगभरातले 9000 पेक्षा जास्त जण – यात दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, लेखक, गीतकार, संगीतकार आणि इतर सिनेमाकार - या अकादमीचे सदस्य आहेत.
 
कुणालाही याचं सदस्य होता येत नाही. त्यासाठी सिनेसृष्टीत तुम्ही तुमच्या कॅटेगरीत सक्रिय असणं आवश्यक असतं – दिग्दर्शन, अभिनय, लेखन, संगीत, इत्यादी. आणि हो, तुम्हाला सदस्य होण्याचं निमंत्रण अकादमी पाठवतं.
 
तुम्ही अर्ज करू शकत नाही. फक्त ज्यांना ऑस्कर्सचं नामांकन मिळतं, त्यांना अकदामी स्वतःहून सदस्यत्वाचं निमंत्रण पाठवतं.आता या अकादमी पुरस्कारांना ऑस्कर्स का म्हटलं जातं? तर जी ट्रॉफी विजेत्यांना दिली जाते, तिला ऑस्कर म्हटलं जातं. हे नाव खरंतर कसं पडलं, याच्या अनेक कथा आहेत, पण कुठलीही एक अशी खात्रीने सांगता येणं अवघड आहे. असो.पण हे ऑस्कर अवॉर्ड्स कुणाला दिले जातात?
 
ऑस्कर पुरस्कार कसे दिले जातात?
भारतात वर्षभरात हजारो सिनेमे वेगवेगळ्या भाषांमध्ये बनतात, जगभरात तर असे लाखो सिनेमे रिलीज होतात. पण ऑस्करच्या नामांकनासाठी पात्र ठरायच्या काही अटी असतात -
 
तो सिनेमा किमान 40 मिनिटांचा असावा
लॉस एंजेलिसमधल्या कुठल्याही थिएटरमध्ये तो किमान सात दिवस दाखवण्यात आलेला असावा
तो जानेवारी 1-डिसेंबर 31 या दरम्यान चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला असावा, आणि त्याआधी तो कुठल्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला नसावा

अर्थात या अटींना अपवाद असतात फॉरेन लँग्वेज कॅटेगरीसाठी जाणार सिनेमे, जसं की भारताकडून यापूर्वी गेलेले मदर इंडिया, सलाम बाँबे, लगान हे हिंदी सिनेमे किंवा मराठीतले श्वास, हरिशचंद्राची फॅक्ट्री आणि कोर्ट. या कॅटेगरीसाठी प्रत्येक देश एकच सिनेमा पाठवू शकतो.
 
या सर्व अटी पाळणाऱ्या सिनेमांना मग त्यातील कलाकारांच्या नावांसह एक अर्ज अकादमीला करावा लागतो. त्यातून मग अकादमी नामांकनांसाठी पात्र सिनेमांची यादी, एक Reminder List जाहीर करतं, ज्यात जगभरातले 400पेक्षा जास्त पात्र सिनेमे असू शकतात. मग यातून अकादमीचे सदस्य अंतिम 5 निवडतात आणि मग त्यातून अंतिम विजेता घोषित केला जातो.
 
अकादमीचे सदस्य विजेते कसे निवडतात?
तर अकादमी ऑफ मोशन पिच्चर आर्ट्स आणि सायन्सेसचे सदस्य हे सिनेविश्वातल्या त्यांच्या कामानुसार 17 शाखांमध्ये विभागलेले असतात – अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, संगीतकार, डॉक्युमेंट्री मेकर, सिनेमॅटोग्राफर, कॉस्च्युम डिझाईनतर, साउंड डिझाईन, विझ्युअल इफेक्ट्स, मेकअप, इत्यादी. कुणालाही एकापेक्षा जास्त शाखेत स्थान देता येत नाही. याच 17 शाखांमधल्या एकूण सदस्य कलाकारांपैकी दरवर्षी काही कलाकारांची एक ज्युरी तयार होते. या ज्युरी मेंबर्सची नेमकी यादी कधीच जाहीर होत नाही, पण कुणाकुणाला अकादमीने निमंत्रित केलंय, याची यादी कळते.
 
हे ज्युरी मेंबर्स त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातल्या 20 पेक्षा जास्त कॅटेगरींमधले विजेते निवडतात. म्हणजे ज्युरीमधले अभिनेते सदस्य फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता वा अभिनेत्री, या पुरस्कारांसाठी मतदान करू शकतात. तर संगीतकार ज्युरी हे सर्वोकृष्ट गाणं आणि सर्वोकृष्ट पार्श्वसंगीताची निवड करू शकतात.
 
याचं गणित सोपं आहे – अंतिम 5 नामांकनांपैकी ज्याला सर्वांत जास्त मतं, तो विजेता ठरतो.
फक्त एका पुरस्कारासाठी सर्व सदस्य मतदान करू शकतात – सर्वोत्कृष्ट सिनेमा अथवा Best Motion Picture. आता तो कसा निवडला जातो? त्यासाठी Preferential Ballot System नावाची एक पद्धत वापरली जाते, ज्यात ज्युरी सदस्यांना प्राधान्यक्रमाने मतं द्यावी लागतात. या एकमेव गटासाठी 10 नामांकनं असतात. आणि ज्याला अर्ध्याअधिक मतं मिळतील, तोच सिनेमा जिंकतो. म्हणजे काय?
 
समजा सुरुवातीला A, B, C, D, E, F, G, H, I, J असे दहा सिनेमे आहेत. तर सदस्यांना या सिनेमांचा क्रम त्यांच्या पसंतीनुसार द्यावा लागतो.
समजा यापैकी एकाही सिनेमाला जर 50 टक्क्यांपेक्षा जास्त पहिल्या पसंतीची मतं मिळाली, तर तो सिनेमा सहाजिकच The best Motion Picture ठरतो. पण जर चित्र स्पष्ट नसेल, तर आधी या दहामधून ज्या सिनेमांना सर्वांत कमी मतं मिळाली आहे, ती काढली जातात, आणि त्यांच्या यादीतलं दुसरं मत ज्या सिनेमाला आहे, त्याकडे त्याचे गुण वळवले जातात.
 
समजा एका सदस्याने सिनेमा Cला पहिली पसंती दिली होती, पण तो पहिल्या राउंडमध्ये सर्वांत खाली आला, तर मग त्याच सदस्याचं मत दुसऱ्या पसंतीच्या सिनेमाकडे वळवलं जातं. असं करत करत सर्वांत कमी गुण मिळवणारे सिनेमे तोवर काढले जातात, जोवर एक कुठलाही सिनेमा बहुमताचा आकडा गाठत नाही. आणि तेव्हाच मिळतो सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार.
 
ऑस्करमधले वाद आणि टीका
तुम्हाला विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकच्या थोबाडित मारल्याचा हा क्षण आठवतच असेल. हा काही पहिला प्रसंग नव्हता जेव्हा अकादमी पुरस्कारांवरून वाद झाला होता. 2016मध्ये ऑस्कर लाईव्ह सोहळ्यातल्या सर्वांत महत्त्वाच्या क्षणी म्हणजे सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्काराची घोषणाच चुकली होती. नाव जाहीर झालं लालालँडचं, विजेता होता मूनलाईट.

हे तर ताजे वाद झालेत.
1973च्या पुरस्कार सोहळ्यात ‘द गॉडफादर’ या गाजलेल्या सिनेमासाठी मार्लन ब्रँडो यांना सर्वोत्कष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला होता. पण तो नाकारायला त्यांनी एका तरुण हक्क कार्यकर्तीला पाठवलं होतं, जिने त्यांचा संदेश तेव्हा अकादमीपर्यंत पोहोचवला होता. तिच्या भाषणावर जनतेने ओरडून रोष व्यक्त केला होता, ज्यासाठी अकादमीने अगदी 2022मध्ये माफी मागितली होती.
 
इतकंच नव्हे तर अनेकदा अकादमीवर श्वेतवर्णीयांना झुकतं माप देण्याचा आरोप झाला आहे. #OscarsSoWhite हा सोशल मीडियावरचा हॅशटॅग एक चळवळ म्हणून अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्याचा परिणाम म्हणून आज अकादमीतच नव्हे तर नामांकनांमध्येही बरंच वैविध्य पाहायला मिळतं.
म्हणूनच कोरियन भाषेतला द पॅरासाईट हा 2020मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान पटकावणारा पहिला बिगरइंग्रजी सिनेमा ठरला.
 
भारताची ऑस्करमधली कामगिरी
ऑस्कर म्हटलं की आधी आठवतं ए आर रहमानचं 'जय हो'. खरंच 2009 साली स्लमडॉग करोडपती या सिनेमानं इतिहासच रचला आणि भारतात एकाच वर्षात तब्बल 4 ऑस्कर ट्रॉफी आल्यात.
 
यापैकी दोन ए आर रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत आणि सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी, अर्थात जय हो. याच गाण्यासाठी गुलझार यांनाही सहपुरस्कार देण्यात आला.
 
याशिवाय बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी रसूल पुकुट्टी यांना रिचर्ड पाईक आणि इयन टॅप यांच्यासह ऑस्कर देण्यात आला.
अर्थात हा सिनेमा परदेशी भाषेच्या गटामध्ये नव्हता. हा मूळ ब्रिटिश इंग्लिश सिनेमा होता ‘स्लमडॉग मिलियनेअर’, त्यामुळे त्याला इतक्या कॅटेगरींमध्ये नामांकन मिळालं होतं.
 
पण तुम्हाला माहितीय, भानू अथय्या या ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या – 1983 साली आलेल्या रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या सिनेमासाठी. तर सत्यजित रे यांनाही 1992 साली त्यांच्या सिनेक्षेत्राला योगदानासाठी ऑस्करने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

ऋचा चढ्ढाला पत्रकार व्हायचं होतं, पण अभिनेत्री झाली

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

गुम है किसी के प्यार में' शोमध्ये शीझान खानची धमाकेदार एन्ट्री, महत्त्वाची भूमिका साकारणार

सर्व पहा

नवीन

एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले

‘लेक असावी तर अशी’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवारी २२ डिसेंबरला झी टॉकीजवर!

15 व्या दिवशी देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 ने केला 1500 कोटींचा टप्पा पार

भारतात या ठिकाणी करा अद्भुत असे न्यू ईयर सेलिब्रेशन

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

पुढील लेख
Show comments