Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची लस आठ वेळा घेतली, नवव्यांदा घेताना पकडले

Webdunia
सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:13 IST)
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंट ने जगासमोर पुन्हा एकदा निर्बंधांचे युग आणले आहे. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे कोरोना व्हायरस आणि लसीच्या मानकांशी खेळत आहेत. असेच एक प्रकरण बेल्जियममधून समोर आले आहे जिथे एका तरुणाने कोरोना लसीचे आठ डोस घेतले आणि नवव्यांदा घेण्यासाठी पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी त्याला लगेच पकडले.
ही घटना बेल्जियममधील आहे.ही धक्कादायक घटना वालून प्रांतातील चार्लेरोई शहरात समोर आली आहे. या तरुणाची ओळख उघड झाली नसली तरी त्याने केलेले कृत्य मात्र नक्कीच सांगितले आहे. हा तरुण लस न घेता प्रमाणपत्र मिळवू इच्छिणाऱ्या लोकांशी संपर्क साधायचा आणि त्याबदल्यात त्यांच्याकडून पैसे घेत असे. हा तरुण त्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्याऐवजी स्वतः लस घेण्यासाठी जात असे. 
लस न घेता प्रमाणपत्र मिळवायचे असल्याने लोक त्याला पैसे द्यायचे.मोबदल्यात तो लस घेत असे.  मात्र हा तरुण नवव्यांदा हे काम करण्यासाठी गेला असता त्याच्या ओळखपत्राच्या आधारे आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याला ओळखले. त्याला पकडताच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की त्याने प्रत्यक्षात कोरोना लसीचे आठ डोस घेतले होते. त्याला ताबडतोब लॅबमध्ये पाठवण्यात आले आणि तज्ज्ञांच्या पथकाने त्याची तपासणी केली असता तो सामान्य असल्याचे आढळून आले, म्हणजेच इतक्या वेळा लसीचा डोस देऊनही त्याच्या शरीरावर कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. सध्या त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाला सलाम केला, बदलापूरमध्ये विकास योजना जाहीर केल्या

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

पुढील लेख
Show comments