Marathi Biodata Maker

पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेची माघार

Webdunia
शुक्रवार, 2 जून 2017 (11:38 IST)
जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पॅरिस क्लायमेट करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेची ही भूमिका पर्यावरण संरक्षणासाठी काम करणा-या अनेक संघटनांसाठी एक धक्का आहे. 
 
अमेरिकन जनतेच्या हिताचे रक्षण करणे माझे पहिले कर्तव्य आहे. पॅरिस क्लायमेट करारातून माघार घेत असलो तरी, नव्या तरतुदींसह पुन्हा करारामध्ये सहभागी होऊ किंवा नव्याने करार करु असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ओबामा यांच्या राजवटीत झालेला पॅरिस क्लायमेट करार अमेरिकेवर अन्यायकारक होता. नवीन करार अमेरिकेन जनता, कामगार आणि उद्योग यांच्या हिताचा असला पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. नवीन करार झाला तर चांगलेच आहे पण झाला नाही तरी फार काही बिघडत नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

LIVE: मालेगाव महापौर निवडणुकीसाठी ओवेसींसोबत एकनाथ शिंदे एकत्र येणार!

इस्लामाबादमध्ये शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत स्फोट; 31 जणांचा मृत्यू

सुनेत्रा पवार यांचे नवे निवासस्थान 'देवगिरी' बंगला महाराष्ट्र सरकारने अधिकृत मान्यता दिली

सोलापुरातील प्रसिद्ध बेकरी मालकाने केली आत्महत्या

RCB ला मोठी रोख रक्कम मिळाली, दिल्ली कॅपिटल्सना 3 कोटी मिळाले

पुढील लेख
Show comments