suvichar

जपानमध्ये भूकंप, तीव्रता ६.१ रिश्टर स्केल

Webdunia
सोमवार, 18 जून 2018 (15:01 IST)
पश्चिमी जपानमधील मेट्रोपॉलिटन शहर असलेल्या ओकासामध्ये झालेल्या भूकंपामध्ये तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर ४०हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओकासामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. तर जपानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसर भुकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी होती. ओकासा शहरास लागून असलेल्या शहरांमध्येही भूकंपाचे हादरे जाणवले. 
 
खबरदारीचा उपाय म्हणून ओकासा शहरामधील रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. बुलेट ट्रेनही काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. विमान सेवाही विस्कळीत झाली आहे. जवळपास पावणे दोन लाख घरांमधील वीजपुरवठा बंद पडला. पण प्रशासनाला तातडीने कार्यवाही करत वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

LIVE: बकरीदपूर्वी कोपरगावमध्ये अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर कारवाई

वर्ध्यात पाण्याच्या टाकीत पडून २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

मुंबईत मंत्रालयासमोर शरद पवार गटाचे आंदोलन! महायुती सरकारविरोधात तीव्र आंदोलन

पुण्यात जनगणनेच्या कामावर जात असलेल्या महिला शिक्षिकेला डंपरने चिरडले; शिक्षक संघटनांनी आंदोलन सुरू केले

पुढील लेख
Show comments