Marathi Biodata Maker

अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी

Webdunia
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:43 IST)
अमेरिकेतील दहा राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असून तापमान उणे 20 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले आहे. शिकागो नदी गोठून गेली आहे. हवामान खात्याने तापमान उणे 70अंश सेल्सियस पर्यंत कमी होण्याचा इशारा दिला आहे. इलिनॉय, आयोवा, मिनेसोटा, उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, विस्कॉन्सिन, कन्सास, मिसोरी आणि मोटाना येथे कडाक्‍याची थंडी आहे. 6 राज्यातील टपाल सेवा बंद करण्यात आलेली आहे.
 
शिकागोची स्थिती सर्वात वाईट झालेली आहे. येथील तापमान उणे 27 पर्यंत कमी झाले आहे. ते आणखी कमी होणाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खराब हवामानामुळे 2700 विमान उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहेत यापैकी 1500 विमाने शिकागोहून उड्डाण करणार होती वा तेथे उतरणार होती.
 
अमेरिकेतील 72 टक्के लोकांना येत्या काही दिवसात शून्यापेक्षा कमी तापमानाला सामोरे जावे लागणार आहे. आणि 25 टक्के लोकांना शून्याच्या आसपास तापमान सोसावे लागणार आहे. बहुतेक दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र किराणामालाची दुकाने आणि पेट्रोल पंप चालू ठेवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
ही अमेरिकेतीक ऐतिहासिक थंडी असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रुपाली चाकणकर आणि अशोक खरात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये ३ दिवस एकत्र? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

एनसीपीला मोठा धक्का: माजी खासदार आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

पुढील ६ महिने शासकीय सोहळ्यांना ब्रेक! पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रशासकीय काटकसरीवर भर

LIVE: गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणूक जाहीर

सीएनजी दरवाढ: मुंबईत सीएनजीचे दर वाढले, आता ऑटो भाडेवाढीची शक्यता

पुढील लेख
Show comments