Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel Hamas War: गाझामधील इस्रायली हल्ले रोखण्यासाठी इजिप्तमध्ये बैठक होणार

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2024 (08:32 IST)
इस्रायल आणि हमास यांच्यातील दीर्घकाळ चाललेले युद्ध थांबवण्यासाठी हमासची एक टीम कैरोमध्ये या विषयावर चर्चा करणार आहे. हमासला हे युद्ध थांबवायचे आहे, त्यामुळे आता युद्धविराम करारावर सहमती दर्शवली आहे. या काळात इस्रायलच्या तुरुंगात कैद असलेल्या पॅलेस्टिनींची सुटका करण्याची मागणीही केली जाणार आहे. 
 
हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी सोमवारी प्रयत्न सुरू झाले आहेत. यावर चर्चा करण्यासाठी हमासचे शिष्टमंडळ कैरोला पोहोचणार आहे. एका अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिष्टमंडळ हमासने कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांना सादर केलेला युद्धविराम प्रस्ताव तसेच इस्रायलच्या प्रतिसादावर चर्चा करणार आहे. तसा नवा प्रस्तावही तयार केल्याची माहिती त्यांनी दिली.

यामध्ये हमासने इस्रायलमध्ये कैदेत असलेल्या पॅलेस्टिनींच्या सुटकेच्या बदल्यात 40 ओलिसांची सुटका करण्याची मागणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. गाझामध्ये तात्काळ युद्धविराम तसेच हमासच्या नेतृत्वाखाली 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर ओलीसांची सुटका व्हावी यासाठी या चर्चेत प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे युद्ध सात महिन्यांपासून सुरू आहे. ऑक्टोबर 2015 मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली.
 
Edited By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments