Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Israel: आयडीएफने लेबनॉनच्या हिजबुल्लाह दहशतवादी तळांवर हल्ला केला

Webdunia
बुधवार, 18 ऑक्टोबर 2023 (07:24 IST)
इस्त्रायली हवाई दलाने (IAF) गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी तळांवर आणि लष्करी संरचनांवर हल्ला केला आहे. इस्रायली हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. 
 
ट्विटरवर पोस्ट करत हवाई दलाने म्हटले आहे की, 'काही वेळापूर्वी IAF ने लेबनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी तळांवर आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला केला आहे. सोमवारी, इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, लेबनॉन सीमेवरील अनेक लष्करी चौक्या गोळीबारात आल्या. 
 
इस्रायली वायुसेनेने (आयडीएफ) म्हटले की आयडीएफ टँकच्या दिशेने गोळीबार करण्यात आला, त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही गोळीबार केला. गाझाभोवती सायरन वाजवण्यात आले. हमासचे दहशतवादी इस्रायलवर सलग 10 दिवस हल्ले करत आहेत.
 
आयडीएफने शूरा कौन्सिलचे अध्यक्ष ओसामा माजिनी यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि सांगितले की, माजिनी यांचा हवाई हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, मॅझिनीने इस्रायलविरुद्ध हमासच्या दहशतवादी कारवायांचे निर्देश दिले होते. इस्रायलने सोमवारी लेबनॉनला लागून असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्यास सांगितले. सर्व लोकांना सध्या राज्य अनुदानीत अतिथीगृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. 
 
प्रसारमाध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनला लागून असलेल्या इस्रायलच्या हद्दीत सहा अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. याशिवाय आणखी नऊ रॉकेट डागण्यात आले, ज्यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.  
 
 




Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसची रुग्णसंख्या 11 झाली

Mumbai Rains: मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा,तिन्ही सैन्यदल सतर्क

संसदेत वाद झाल्यानंतर अग्निवीर कुटुंबाला मिळाली विम्याची रक्कम

लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीतच, इतिहासकार इंद्रजित सावंतांचा दावा

BMW Hit-And-Run Case: चालकाने गाडी थांबवली असती तर पत्नीला वाचवता आले असते, पीडितेच्या पतीची व्यथा

सर्व पहा

नवीन

मुंबई उच्च न्यायालयाचा महिलेला 26 आठवड्यांनंतर गर्भपात करण्याची परवानगी देण्यास नकार

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर वाढला 50 उड्डाणे रद्द, विमानसेवेला फटका

Kathua Terror Attack: डोंगरी भागात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, चार जवानांचा मृत्यू, चार जखमी

BMW हिट अँड रन प्रकरणः शिवसेना नेत्याला दिलासा, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला

NEET परीक्षेवर गुरुवारी पुढील सुनावणी, पहिल्यांदा पेपर कधी फुटला एनटीएला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

पुढील लेख
Show comments