Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाझामध्ये युद्धबंदीनंतर इस्रायलचा सर्वात मोठा हवाई हल्ला, अनेकांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 18 मार्च 2025 (12:25 IST)
गाझामध्ये युद्धबंदीनंतर आज सकाळी इस्रायलचा सर्वात मोठा हवाई हल्ला झाला त्यात किमान 235 लोकांचा मृत्यू झाला.युद्धबंदीनंतर गाझामध्ये हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. हमासने इशारा दिला की गाझामध्ये इस्राईलचे नवीन हल्ले युद्द्धबंदीचे  उल्लंघन आहेत आणि त्यामुळे ओलिसांचे जीवन धोक्यात येऊ शकते.
ALSO READ: उत्तर मॅसेडोनिया नाईटक्लबमध्ये आग लागून 51 जणांचा होरपळून दुर्देवी मृत्यू
 जानेवारीमध्ये युद्धबंदी लागू झाल्यानंतर गाझामध्ये हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, युद्धबंदी वाढवण्याच्या चर्चेत कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती न झाल्याने त्यांनी हल्ल्याचे आदेश दिल्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले. इस्रायल आता लष्करी ताकद वाढवून हमासविरुद्ध कारवाई करेल, असे नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
ALSO READ: इस्रायली सैन्याच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू, 14 जण जखमी
गाझासोबतच इस्रायलने लेबनॉन आणि सीरियामध्येही हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. सीरियातील दारा भागातील एका निवासी भागावर हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलने लेबनॉनमध्ये दोन हिजबुल्लाह दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावाही केला. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: इस्त्राईलच्या हैफामध्ये चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, चार जण जखमी
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

LIVE: औरंगजेबाचे कौतुक करणारे देशद्रोहीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान

औरंगजेबाचे कौतुक करणारे देशद्रोहीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान

स्पेसएक्स कॅप्सूल सुनीता विल्यम्ससह पृथ्वीसाठी रवाना

औरंगजेबाच्या कबरेची सुरक्षा वाढवली, देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचे दिले आश्वासन, म्हणाले -

औरंगजेबाच्या कबरच्या वादावर मायावतींनी प्रतिक्रिया देत ट्विट केले

पुढील लेख
Show comments