Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जपान : धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना ६ दिवस अतिरिक्त सुट्टी

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (14:58 IST)

जपानच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी हटके नियम लागू केलाय. या नियमानुसार जे कर्मचारी धूम्रपान करत नाहीत त्यांना धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत सहा दिवसांची अतिरिक्त सुट्टी दिली जाणार आहे.   हा नियम टोकियोस्थित ऑनलाईन कॉमर्स कन्स्लटिंग अँड माकेर्टिंग कंपनी  करण्यात आलाय. 

धूम्रपान कऱणाऱे कर्मचारी इतरांच्या तुलनेत अनेकदा जागेवरुन उठतात. यामुळे कंपनीचे नुकसान होतेच. मात्र त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना आपण धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत अधिक काम करतोय असे वाटते. 

कंपनीचे प्रवक्ता हिरोताका मत्सुशिमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे ऑफिस २९व्या मजल्यावर आहे आणि धूम्रपानासाठी कर्मचाऱ्यांना तळ मजल्याला यावे लागते. यात १० मिनिटे वाया जातात. तसेच धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती एकत्र भेटल्या की त्यांच्या गप्पा रंगतात आणि त्यात वेळ जातो. 

त्यामुळेच कंपनीने धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू करण्यात आलाय. यामुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी झालीये. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments