Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना महामारीच्या नंतर आता मारबर्ग संसर्गामुळे तणाव वाढला, देशात दोन संशयित रुग्ण आढळले

Webdunia
रविवार, 10 जुलै 2022 (12:45 IST)
जग अजूनही कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देत आहे, त्याच दरम्यान नवनवीन आजारही उदयास येत आहेत. आता घाना, पश्चिम आफ्रिकेत मारबर्ग या धोकादायक संसर्गाचे रुग्ण.आढळले आहेत.मारबर्ग संसर्ग इबोला व्हायरसपेक्षा वेगाने पसरतो. घानाच्या डॉक्टरांनी दोन रुग्णांचे नमुने घेतले आहेत. यामध्ये मारबर्गची पुष्टी झाल्यास घानामधील मारबर्ग विषाणूची ही पहिलीच घटना असेल. 

मिळालेल्या माहितीनुसार, घानाच्या नोगुची मेमोरियल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्चने 2 रुग्णांचे नमुने गोळा केले आहेत.  तपासात हे दोन्ही प्रकरण मारबर्ग पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.  आता हे नमुने सेनेगलमधील इन्स्टिट्यूट पाश्चर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) केंद्राकडे पाठविण्यात आले आहेत, जेणेकरून रुग्णांना मारबर्ग संसर्ग झाला आहे की नाही याची WHO कडून अधिकृत पुष्टी करता येईल.
 
लक्षणे -
घानाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये अतिसार, उलट्या, ताप आणि अस्वस्थता ही लक्षणे दिसून आली. दक्षिण अशांती भागातील रहिवासी असलेल्या दोन्ही रुग्णांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. जेणेकरून विषाणूचा शोध घेता येईल. यासोबतच रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही केले जात आहे.कारण    विषाणूच्या तपासणीत ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून हा मारबर्ग विषाणू रुग्णांपर्यंत कसा पोहोचला हे जाणून घेणे सोपे होणार आहे.

दोन्ही रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून ते सध्या निरीक्षणात आहेत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. मारबर्ग बहुधा वटवाघळांपासून लोकांमध्ये पसरला आहे. संसर्ग झाल्यास खूप ताप, डोकेदुखीची तक्रार असते तर काही रुग्णांमध्ये संसर्ग झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत रक्तस्त्राव झाल्याचीही नोंद झाली आहे. या विषाणूवर उपचार करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही .
 
डब्ल्यूएचओचे अधिकारी डॉ. फ्रान्सिस कासोलो यांच्या म्हणण्यानुसार, जर या रुग्णांमध्ये मारबर्गची पुष्टी झाली, तर घाना हा पश्चिम आफ्रिकेतील दुसरा देश असेल.जिथे मारबर्ग आढळून आला आहे, या व्हायरसचा रुग्ण गिनीमध्ये दिसण्यापूर्वी. आफ्रिकेत, अंगोला, काँगो, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि युगांडा येथे मारबर्गची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख